Jahnavi Killekar First Post Bigg Boss Marathi Grand Finale: ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले सुरू आहे. ७० दिवसांचा हा खेळ आज प्रेक्षकांचा निरोप घेतोय. पाचव्या पर्वाचा विजेता कोण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच टॉप ६ सदस्यांपैकी जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये रोख रक्कम घेऊन हा खेळ सोडला. खेळ सोडल्यानंतर जान्हवीने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली आहे.
टॉप ६ सदस्यांना आधी सात लाख रुपये रोख रक्कम घेऊन खेळ सोडण्याची संधी देण्यात आली होती. पण कोणत्याच सदस्याने हा शो सोडणार नसल्याचं म्हटलं. त्यानंतर रक्कम दोन लाखांनी वाढवून ९ लाख रुपये करण्यात आले. तेव्हा जान्हवीने ही रक्कम घेऊन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. मतांनुसार जान्हवी किल्लेकर सहाव्या स्थानावर होती. त्यामुळे जर तिने खेळ सोडला नसता तर ती एलिमिनेट झाली असती आणि तिला पैसे मिळाले नसते. तिने योग्य निर्णय घेतला आणि ९ लाख रुपयांची मनी बॅग घेऊन बाहेर पडायचं ठरवलं.
हेही वाचा – Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live: वाचा अपडेट्स एका क्लिकवर
जान्हवीने बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर पहिली पोस्ट केली आहे. “बिग बॉसच्या घरात जाताना मी किलर गर्ल म्हणून गेले होते आणि आता या ७० दिवसांच्या प्रवासानंतर तुम्ही सगळ्यांनी मला टास्क क्वीन म्हणून इतकं प्रेम दिलंत, त्यासाठी धन्यवाद,” अशी पोस्ट जान्हवीने केली आहे.
हेही वाचा – ९ लाख घेऊन जान्हवीने घेतली घरातून एक्झिट! बाहेर येताच पती किरण किल्लेकर म्हणाले, “तू आमच्यासाठी… “
तिने या पोस्टला “बिग बॉसचा खेळ या टप्प्यावर खूपच कठीण झाला होता! त्यात मला त्यावेळी जे बरोबर वाटलं ते मी केलं. तुम्ही सगळ्यांनी माझी आजपर्यंत इतकी साथ दिली त्यासाठी तुम्हा सगळ्यांची मी खूप खूप मनापासून आभारी आहे. जाता जाता ही #taskqueen चा खिताब घेऊनच बाहेर आली! परत एकदा मनापासून धन्यवाद!” असं कॅप्शन दिलं आहे.
“धनंजय अतिशय पोरकटपणे वागत होता”, वर्षा उसगांवकरांना डीपीचं खटकलं वागणं, म्हणाल्या, “अंकिताचा वकील…”
जान्हवीच्या या पोस्टवर कमेंट्स करून लोक तिने घेतलेल्या निर्णयाबाबत तिचं खूप कौतुक करत आहेत. तिने खूप चांगला निर्णय घेतला. जान्हवी खरंच डान्स क्वीन आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.