Jahnavi Killekar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकल्यानंतर जान्हवी किल्लेकरचा चाहता वर्ग प्रचंड वाढला आहे. चाहते जान्हवीच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट तपासत असतात, त्यामुळे जान्हवी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहते. चाहत्यांना आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट देत असते. अशात नुकतीच जान्हवी ‘गंधार गौरव पुरस्कार सोहळा २०२४’ मध्ये उपस्थित राहिली. या पुरस्कार सोहळ्याला जाण्यासाठी तिने सुंदर साडी परिधान केली आहे. साडीवरील तिचे काही फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गुलाबी रंगाच्या साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. तसेच तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘गंधार गौरव पुरस्कार सोहळा २०२४.’ आता तिचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी यावर अनेक हार्ट इमोजी शेअर केले आहेत. त्यात एका चाहत्याला जान्हवीला पाहून थेट त्याच्या पत्नीची आठवण आली आहे. या महिन्यात जान्हवीमुळे माझा खर्च वाढला, असे त्याने कमेंटमध्ये लिहिले आहे.
हेही वाचा : ट्विंकल खन्ना निर्मात्यांसमोरच चित्रपटाला ‘बकवास’ म्हणाली अन्…; अक्षय कुमारने सांगितला पत्नीचा किस्सा
“ताई, आता माझी बायकोसुद्धा अशी साडी घ्या बोलणार. खर्च वाढणार माझा या महिन्याचा”, अशी मजेशीर कमेंट या नेटकऱ्याने केली आहे. या कमेंटवर जान्हवीनेदेखील हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. जान्हवीने परिधान केलेली साडी खरोखर फार सुंदर आहे. गुलाबी रंगाच्या या साडीवर निळ्या आणि पिवळ्या रंगाची नक्षी आहे. सध्या चंद्रकोर साडीचा ट्रेंड सुरू आहे, त्यामुळे जान्हवीनेसुद्धा चंद्रकोर असलेली साडी परिधान केली आहे. गळ्यात आणि कानात सुंदर दागिने आणि कपाळी सुंदर टिकली लावल्याने ती या लूकमध्ये आणखी जास्त सुंदर दिसत आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या घरात असताना जान्हवी किल्लेकरचा खेळ सुरुवातीला अनेकांना आवडला नव्हता. मात्र, नंतर तिने आपल्या खेळाची पूर्ण दिशा बदलली आणि जोमाने टास्क पूर्ण करण्यास सुरुवात केली. बिग बॉसच्या घरात अनेक टास्कमध्ये जान्हवी बऱ्याचदा जखमी झाली होती. मात्र, स्वत:साठी आणि बिग बॉसच्या घरातील सदस्यांसाठी दुखापत झालेली असतानादेखील ती टास्क पूर्ण करायची.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर अनेक ठिकाणी जान्हवीचा सत्कार करण्यात आला. यंदा भाऊबीजनिमित्त ती थेट सूरज चव्हाणच्या घरीसुद्धा गेली होती. येथे दोघांनी एकत्र सुंदर भाऊबीज साजरी केली. त्यावेळचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हेही वाचा : इजिप्तच्या लॉगिना सलाहने रचला इतिहास; त्वचारोग असूनही मिस युनिव्हर्स स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
जान्हवीने बिग बॉसच्या घरात येण्याआधी कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘सानिया’ हे खलनायिकेचे पात्र साकारले होते. तसेच तिने ‘श्री स्वामी समर्थ’ या मालिकेतदेखील काम केले आहे. जान्हवी सध्या ३० वर्षांची आहे. तिचा जन्म ११ ऑक्टोबर १९९४ साली ठाण्यात झाला. तिच्या पतीचे नाव किरण किल्लेकर आहे. तिला आठ वर्षांचा मुलगासुद्धा आहे. आपल्या कलेच्या जोरावर तिने ‘मिसेस रायगड’ हा किताबदेखील पटकावला आहे.