अभिनेत्री जान्हवी किल्लेकर( Jahnavi Killekar) ही सातत्याने चर्चेत असते. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या पर्वात तिच्या खेळाची मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली पाहायला मिळाली. सुरुवातीच्या काही काळात तिने पंढरीनाथ कांबळे आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा अपमान केल्याने तिला प्रेक्षकांसह कलाकारांनी कडक शब्दांत सुनावले होते. मात्र, काही काळानंतर तिच्या गेममध्ये बदल झालेला पाहायला मिळाला. आता एका मुलाखतीत जान्हवीने याबद्दल भाष्य केले आहे.
बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय योग्य होता का?
जान्हवी किल्लेकरने नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय योग्य होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना जान्हवीने म्हटले, “माझा बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय योग्य होता. मी हा निर्णय विचार करून घेतला होता, कारण माझा स्ट्रगल बराच बाकी होता. जर मला पटकन एक लेव्हल वर जायचे असेल तर मला बिग बॉस करणे गरजेचं वाटत होतं. तिथं गेल्यानंतर माझा समज असा झाला की, तसंही महाराष्ट्र मला खलनायिका म्हणूनच बघतोय, कारण आतापर्यंत मी ज्या भूमिका केल्या आहेत, त्या खलनायिका आहेत; तर लोकांना मला संस्कारी किंवा गुणी मुलगी बघायला का आवडेल? पण नंतर मला समजलं की, महाराष्ट्राला माझ्याकडून वेगळ्याच अपेक्षा आहेत. ते समजायला मला एक-दोन आठवडे लागले. त्यानंतर जेल झालं. मला त्यावेळी जाणीव झाली की, महाराष्ट्राला नक्की कुठली जान्हवी बघायची आहे.”
“सुरुवातीपासून मी आहे तशी का दिसली नाही माहितेय का? मी खूप रडकी आहे. त्यामुळे स्ट्रॉंग आहे, मी लढू शकते हे दाखवण्याच्या प्रयत्नात मी कुठेतरी स्वत:लाच हरवून बसले आणि वेगळचं काहीतरी करत बसले. जी बदललेली जान्हवी होती ती सतत रडत होती, कारण ती खरी जान्हवी होती. सुरुवातीला मी स्वत:ला कुठेतरी स्ट्रॉंग केलेलं, पण नंतर ते मी सोडून दिलं, असा तो बदल होता”, असे म्हणत जान्हवीने तिच्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे.
हेही वाचा: रितेश भाऊ अन् जिनिलीया वहिनींकडून खास निमंत्रण! सूरज चव्हाण देशमुखांच्या घरी केव्हा जाणार? म्हणाला, “ते देवमाणूस…”
दरम्यान, जान्हवी किल्लेकरने मराठी मालिकांमध्ये खलनायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. बिग बॉसच्या घरात जान्हवीच्या चुकीच्या वागण्यासाठी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले असले तरी तिच्या खेळाचे कौतुकही मोठ्या प्रमाणात झाले. तिला ‘टास्क क्वीन’ असे म्हटले गेले. शोच्या अखेरच्या टप्प्यात तिने नऊ लाख घेत बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला, त्याचेही मोठे कौतुक झाले. आता अभिनेत्री कोणत्या मालिकेतून किंवा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.