Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपून १० दिवस उलटले आहेत. पण, तरीही चर्चा कायम आहे. यंदाच्या पर्वातील टॉप-६ स्पर्धेक सध्या प्रसिद्धी झोतात आले आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सतत व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच एका मुलाखतीतून जान्हवी किल्लेकरने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात किती कपडे घेऊन गेली होती? याचा खुलासा केला आहे.
‘सिने चित्र’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना जान्हवी किल्लेकरला विचारलं की, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तू ड्रेसिंग ठरवून गेली होती का? की या दिवशी हे घालायचं? दुसऱ्या दिवशी हे घालायचं? हे ठरवलं होतं का? यावर जान्हवी म्हणाली, “खरं सांगू मी १०० कपडे खरेदी गेले होते. कोणाशीही कोलॅब्रेशन केलं नव्हतं. आता माझा बेडरूम कपड्यांनी भरला आहे. काही दिवसांनी मी कपड्यांचा लिलाव लावणार आहे.”
“मी ‘बिग बॉस’च्या घरात जाताना १०० कपडे आणि ४० नाईट ड्रेस विकत घेतले होते. कारण मला ते नको होतं, काही गोष्टी राहिल्या…मग आमचे फोटो नाही आले. तसंच मला दुसऱ्यांनी डिझाइन केलेले कपडे फार आवडत नाहीत. कारण आपल्याला माहीत आहे ना काय सूट करणार, काय कम्फर्टेबल असेल. महत्त्वाचं म्हणजे ते योग्य दिसलं पाहिजे,” असं जान्हवी किल्लेकर म्हणाली.
पुढे जान्हवीला विचारलं की, तुला १०० कपडे घ्यावे वगैरे कसं सुचलं? तेव्हा जान्हवी म्हणाली, “माझं कसं असतं, एखादं काम हातात घेतलं तर ते पूर्ण करण्यासाठी मी काहीही करते. माझा दोन दगड्यावर पाय नसतो. मला मालिका पण करायची आहे आणि मला बिग बॉसमध्ये पण जायचं आहे, असं नसतं. मी बिग बॉसमध्ये जाण्याआधी स्वतःसाठी दोन महिन्यांचा वेळ घेतला होता. कारण बिग बॉसच्या घरात जाणं सोप नाहीये. तुम्ही तेवढे तयार झालं पाहिजे.”
हेही वाचा – Bigg Boss 18 : अविनाश मिश्रा घराबाहेर नाही तर गेला जेलमध्ये? दिला मोठा अधिकार
हेही वाचा – Video: खुशबू तावडेचं दुसरं डोहाळे जेवण घरीच साध्या पद्धतीने पडलं पार, पाहा व्हिडीओ
त्यानंतर जान्हवी किल्लेकर म्हणाली की, घरातल्यांच्या पाठिंब्यामुळे मी बिग बॉसमध्ये गेले. एक आई म्हणून छोट्या मुलाला सोडून जाणं खूप कठीण काम होतं. कारण भलेही मी लांब असेल तरीही तुम्हाला एक धाकधूक असते ना तो बरा असेल ना. पण, मला माहीत होतं, त्याचे वडील माझ्यापेक्षा त्याची उत्तम काळजी घेतील.
© IE Online Media Services (P) Ltd