Jahnavi Killekar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर घराघरांत लोकप्रिय झाली. ‘बिग बॉस’च्या घरातील सुरुवातीच्या काळातील तिचा खेळ कोणालाच पटला नव्हता. पण, कालांतराने जान्हवीला तिची चूक उमगली आणि ती निक्की-अरबाजच्या ग्रुपपासून वेगळी होऊन एकटी गेम खेळू लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये व्हिलन ठरलेली जान्हवी किल्लेकर ( Jahnavi Killekar ) नंतरच्या काळात ‘टास्क क्वीन’ म्हणून ओळखली जाऊ लागली. पंढरीनाथ कांबळेची देखील तिने माफी मागितली. एवढंच नव्हे तर, शो संपेपर्यंत वर्षा उसगांवकरांशी देखील तिची चांगली मैत्री झाली होती. “माझा मूळ स्वभाव खूप वेगळा आहे…मी फक्त गेमसाठी चुकीचं वागले” असं जान्हवीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. याची प्रचिती तिच्या चाहत्यांना आणखी एका व्हिडीओमुळे आली आहे. सध्या दिवाळीच्या दिवसातील जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Bhool Bhulaiyaa 3 ठरला कार्तिक आर्यनचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट, पहिल्या दिवशी कमावले तब्बल…

जान्हवीचं होतंय कौतुक

दिवाळीच्या सणादिवशी घराघरांत लक्ष्मीपूजन केलं जातं. किल्लेकर कुटुंबीयांनी देखील हा सण साजरा केला. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जान्हवीने तिच्या घरच्या स्त्रियांचं पाय धुवून पूजन केलं. जान्हवीने तिच्या सासूबाईंचे पाय धुतले, स्वत:च्या साडीच्या पदराने त्यांचे पाय पुसले आणि पूजा केली. यावेळी तिच्याबरोबर पती किरण किल्लेकर आणि मुलगा इशान हे देखील उपस्थित होते.

लाडक्या सासूबाईंनी जान्हवीला ( Jahnavi Killekar ) भरभरून आशीर्वाद दिले. जान्हवीचं हे कुटुंबीयांवर असलेलं प्रेम पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खरी लक्ष्मी तर तू आहे, ‘बिग बॉस’मधून ९ लाख रूपये घेऊन आलीस”, “ही आहे खरी जान्हवी”, “खरी लक्ष्मी तुच आहेस”, “संस्कारी मुलगी”, “महाराष्ट्राला खरंच आशा माऊलीची गरज आहे”, “जान्हवी मॅडम मानलं तुम्हाला” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा : Video : ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकरांचा दिवाळी स्पेशल Reel व्हिडीओ पाहिलात का? नेटकरी करतायत कौतुक

हेही वाचा : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी

दरम्यान, जान्हवीच्या ( Jahnavi Killekar ) या व्हिडीओवर अवघ्या काही तासांतच ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. आता ‘बिग बॉस’नंतर जान्हवी किल्लेकर प्रेक्षकांना कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jahnavi killekar wash mother in law feet and perform pooja netizens praises her watch video sva 00