Bigg Boss Marathi 5 चे पर्वाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. घराबाहेर पडल्यानंतरदेखील या स्पर्धकांची मोठी चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. जान्हवी किल्लेकर ही चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांपैकी एक आहे.

काय म्हणाली जान्हवी किल्लेकर?

जान्हवीने नुकतीच ‘मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला ९ लाख रुपये घेऊन येण्याच्या निर्णयाबद्दल विचारले. त्यावर तिने म्हटले, “मी पैशाची बॅग घेतली. मला वाईट वाटत होतं. पण जेव्हा रितेश सरांनी एन्व्हलप उघडलं आणि सांगितलं की जान्हवी तुमचंच नाव आहे. त्यावेळी मला जीवात जीव आला. मी योग्य निर्णय घेतल्यामुळे बरे वाटले. जर मी ते पैसे उचलले नसते तर मी बाहेर जाणार होते, त्यामुळे हाती शून्य राहिलं असतं. जर मी ते पैसे घेतले नसते तर मला अपराधी वाटलं असतं. बिग बॉसने संधी दिली होती. पैसे चोरी करायचे नव्हते. सगळ्या सदस्यांच्या हक्काचे पैसे होते. बिग बॉसने सगळ्यांना संधी दिली होती.”

online fraud of Rs 57 lakhs with senior citizen women on pretext of extra returns
जादा परताव्याच्या अमिषाने वृद्धेची ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे ५७ लाखांची फसवणूक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
prajakta mali marathi actress reveals her weight
प्राजक्ता माळीचं वजन किती? भलंमोठं कॅप्शन लिहित केला खुलासा; म्हणाली, “लोक म्हणू लागलेत एवढी बारीक…”
mmrda fined metro 9 contractor of rs 40 lakh after transit mixer operator die at metro site
मेट्रो ९ च्या कंत्राटदाराला ४० लाखाचा दंड; चालकाच्या मृत्यूनंतर एमएमआरडीएची कारवाई
swapnil rajshekhar tula shikvin changalach dhada
“केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…
scooter caught fire man urinated on it crazy video viral on social media
त्याने पॅंटची चेन उघडली अन्…, स्कूटरने पेट घेताच तरुणांनी काय केलं पाहा, VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांची मालमत्ता आयकर विभागाकडून मुक्त; काय आहे नेमकं प्रकरण? पार्थ आणि सुनेत्रा पवार यांनाही दिलासा

पुढे बोलताना जान्हवीने म्हटले, “जेव्हा सात लाखांसाठी विचारले तेव्हा मी विचार करत होते. मला वाटलं की लोक मला पुन्हा ट्रोल करतील. पण खरं सांगू का आम्ही आत जरी असलो तरी दिसत होतं की टॉप ३ कोण असणार आहे. मला वाटतं होते की आता पर्यंत लक्षात राहिले लोकांच्या, जाता-जातादेखील लोकांच्या लक्षात राहिले पाहिजे. वेगळं काय करू शकते. टॉप ३ मला माहित आहे, चौथी येऊन काय करणार आहे? काय मिळणार आहे. तर मी विचार केला आणि बॅग उचलली. बझर दाबला आणि कारणही सांगितलं. ते कारणदेखील अगदी खरं होतं. चुका खूप झाल्या आहेत, त्यामुळे इतक्या लवकर महाराष्ट्र माफ करणार नाही. त्यांच्याकडून अशी अपेक्षादेखील करू शकत नाही. कारण- ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत. माझी चूक झाली आहे. थोडा वेळ जावा लागेल, त्या गोष्टीला. इतक्या पटकन काही होऊ शकत नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरात शेवटचं प्रायश्चित म्हणून मी माझं नाव शोमधून काढते, असं म्हणून मी बझर दाबला”, असे जान्हवीने म्हटले आहे.

हेही वाचा: “कुरूप वेडा ठरवू नका”, सूरज चव्हाण जिंकला म्हणून टीका करणाऱ्यांना किरण मानेंचं जबरदस्त उत्तर; म्हणाले, “बुक्कीत टेंगुळ आणणारा तो…”

दरम्यान, जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठी ५ च्या घरात नेहमीच चर्चेत राहिली. कधी तिच्या भांडणामुळे, वागण्यामुळे तर कधी टास्कमुळे तीची मोठी चर्चा झाली. आता ९ लाख घेऊन बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत आहे.

Story img Loader