KBC 15 : अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती १५’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. पंजाबचा २१ वर्षीय जसकरण सिंग या हंगामातील पहिला करोडपती बनणार आहे. नुकताच या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित करण्या आला, त्यात त्याने १ कोटी रुपये जिंकल्याचं स्पष्ट झालं, पण आता तो ७ कोटी रुपये जिंकणार की नाही याचं उत्तरही समोर आलं आहे.

पंजाबचा जसकरण ७ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नसल्याने पुन्हा चर्चेत आला आहे. १ कोटी जिंकल्यावर खुद्द अमिताभ बच्चन यांनी त्याचं अभिनंदंन केलं, पण ७ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता न आल्याने जसकरणने खेळ सोडून द्यायचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा : शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ पहिल्याच दिवशी रचणार इतिहास; कमावणार ‘इतके’ कोटी

“पद्म पुराणानुसार हरणाच्या शापामुळे कोणत्या राजाला १०० वर्षं वाघ बनून रहावं लागलं?” हा ७ कोटींचा प्रश्न जसकरणसमोर ठेवला गेला. यासाठी पर्याय होते, १.क्षेमधूर्ति २.धर्मदत्त ३.मितध्वज ४.प्रभंजन. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं प्रभंजन, परंतु जसकरण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही अन् त्याने खेळ सोडून द्यायचा निर्णय घेतला.

एक कोटींच्या प्रश्नाचं उत्तर जसकरणने लाईफ लाइनच्या मदतीने दिलं, पण पुढील या कठीण प्रश्नाचे उत्तर त्याला देता आले नाही. जसकरणने खेळ सोडल्यामुळे बरेच प्रेक्षक निराश झाले, त्याने ज्या पद्धतीने एवढा मोठा टप्पा पार केला ते पाहता तो नक्कीच या प्रश्नाचंही उत्तर देईल असं प्रेक्षकांना वाटलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा आहे. जसकरणचा हा भाग ४ व ५ सप्टेंबर रोजी प्रसारित झाला.

Story img Loader