छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखलं जातं. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अभिनेता घराघरांत लोकप्रिय झाला. यामध्ये त्याने साकारलेली राणादा ही भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’नंतर हार्दिक ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकला होता. सध्या राणादा ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका निभावत आहे. हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा लाडका राणादा लवकरच एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका नेमकी काय आहे? जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे वैदेहीच्या मृत्यूला मोनिकाच जबाबदार असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड होणार आहे. तर, दुसरीकडे मोनिकासाठी सनी नावाच्या व्यक्तीने लिहिलेली प्रेमपत्र मल्हारच्या हाती लागणार आहेत. त्यामुळे मल्हार आणि मोनिकाच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Video : साता जन्माचे सोबती! अजिंक्यने लग्नसोहळ्यात सासू-सासऱ्यांचे मानले आभार, पत्नी शिवानी सुर्वेबद्दल म्हणाला…

मल्हार-मोनिकाचं नातं निर्णायक वळणावर असताना मालिकेत पुन्हा एकदा अभिनेता हार्दिक जोशीची म्हणजेच शुभंकरची एन्ट्री होणार आहे. यापूर्वी देखील हार्दिक या मालिकेच्या काही भागांमध्ये झळकला होता. मोनिकाला प्रेमपत्र लिहिणारा सनी म्हणजे स्वत: शुभंकर असल्याचा खुलासा तो करणार आहे. त्यामुळे शुभंकरच्या रुपात मोनिकाच्या आयुष्यात पुन्हा नवं वादळ आलं आहे.

हेही वाता : “लग्नाच्या वाढदिवशी कर्करोगाबद्दल…”, अभिज्ञा भावेने सांगितला ‘तो’ प्रसंग; पतीबद्दल म्हणाली, “पोटाला ३५ टाके अन्…”

अडचणीच्या या परिस्थितीतून मोनिका कसा मार्ग काढणार? मल्हार मोनिकाला माफ करणार का? काय असेल मल्हार-मोनिकाच्या नात्याचं भविष्य या गोष्टी प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळतील. दरम्यान, ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर वाहिनीवर प्रसारित केली जाते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jau bai gavat fame hardeek joshi soon again re enter in star pravah famous serial sva 00