‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जाऊ बाई गावात’ या रिअ‍ॅलिटी शोची महाविजेती रमशा फारुकी झाली. काल, ११ फेब्रुवारीला ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. तीन महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या पाच जणी महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या. यामधील रमाशाने बाजी मारून ‘जाऊ बाई गावात’ची महाविजेती झाली. रमशाला २० लाखांचा धनादेश आणि ‘जाऊ बाई गावात’ची मानाची ट्रॉफी देण्यात आली. अशी ही महाविजेती रमशा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत झळकली होती.

रमशा फारुकी एक खेळाडू असली तरी तिला अभिनयाची आवड आहे. तिने काही जाहिरातींमध्ये काम केलं आहे. रमशाने बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्याबरोबर एका जाहिरातीमध्ये काम केलं होतं. तसंच ती ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.

हेही वाचा – ‘या’ चिमुकलीला ओळखा पाहू? आहे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये रिपोर्टर रिताच्या भूमिकेत रमशा दिसली होती. याचे व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये रमशा जबरदस्त रिपोर्टिंग करताना दिसत आहे.

हेही वाचा – लवकरच ‘स्टार प्रवाह’वर झळकणार दोन नवे सदस्य, ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याच्या नावाची चर्चा

दरम्यान, ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर रमशा म्हणाली, “Oh My God! तो क्षण जेव्हा सरांनी माझं नाव घेतलं आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि ‘जाऊ बाई गावातच्या’ पहिल्या पर्वातली विजेती आहे ‘रमशा’. तेव्हा मला वाटलं की, मी स्वप्न पाहत आहे. कारण गेले २ महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती. पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झाली आहे. माझ्या मनात तो डायलॉग चालू होता ‘इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है की हर एक गावकरीने इससे मुझे मिलाने की साज़िश की है” खरंच माझ्या आयुष्यातला सर्वात भारी क्षण आहे.”

Story img Loader