छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा कार्यक्रम कायमच चर्चेत असतो. ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा रंजक प्रवास आता लवकरच संपणार आहे. ‘बिग बॉस’ हिंदीचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी (१२ फेब्रुवारी) रंगणार आहे. सध्या बिग बॉस हिंदीच्या महाअंतिम सोहळ्याची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. यंदा बिग बॉस हिंदीच्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे बिग बॉसचे निर्मात्यांवर पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बिग बॉस १६ चा विजेता कोण होणार? याबद्दल विविध तर्क-वितर्क लावले जात आहे. सध्या बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या अभिनेता शिव ठाकरेला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे शिव ठाकरे हा बिग बॉसचा विजेता होऊ शकतो असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार यंदा बिग बॉसची विजेती प्रियांका चौधरी होणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच यावरुन बिग बॉसच्या एका माजी सदस्याने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने बिग बॉसच्या निर्मात्यांवर धक्कादायक आरोपही केले.
आणखी वाचा : ‘बिग बॉस १६’च्या ‘टॉप २’मध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेला जागा नाही? ‘त्या’ ट्वीटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस फेम जय भानुशाली हा कायमच चर्चेत असतो. नुकतंच त्याला बिग बॉस १६ या कार्यक्रमाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याला तुझ्यामते बिग बॉस १६ चा विजेता कोण होणार, असे विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना जयने निर्माते आणि दिग्दर्शकांना टोला लगावला.

अर्चना गौतम, शिव ठाकरे, MC स्टेन आणि प्रियांका चहर चौधरी यांच्यापैकी बिग बॉस 16 चा विजेता कोण असू शकतो? असे त्याला विचारण्यात आले असता तो म्हणाला, यापैकी कलर्स वाहिनीचं कोण आहे? त्यावर रिपोर्टर म्हणाला प्रियंका…ते ऐकल्यावर जय म्हणाला, मग आधी ती जिंकेल. त्यानंतर जर काही झालंच तर शिवला बिग बॉस जिंकण्याची संधी मिळू शकते, असे जयने म्हटले.

आणखी वाचा : Video : “मी एखादा फोटो शेअर केल्यावर गौरव लगेचच…” सई ताम्हणकरने केला खुलासा

जयने दिलेले हे उत्तर ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्याच्या या उत्तराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावर प्रियंका चौधरीला ही बिग बॉसची निश्चित विजेती असल्याचे सांगितले जात आहे. नुकताच बिग बॉसचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यात पहिल्या क्रमांकावर ट्रॉफीसह प्रियंका आणि दुसऱ्या क्रमांकावर स्टॅन असे लिहिले आहे. त्यामुळे प्रियांका ही बिग बॉसची विजेती होणार असं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jay bhanushali taunting on bigg boss 16 makers says priyanka chahar choudhary will be winner because nrp
Show comments