Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी ५’ च्या तिसऱ्या आठवड्यात टास्क, सदस्यांची एकमेकांशी भांडणं पाहायला मिळाली. घराला अरबाज पटेल नवा कॅप्टन मिळाला. तर फोन कॉलमुळे घरातील सदस्य भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. आता या आठवड्यात ‘भाऊचा धक्का’मध्ये होस्ट रितेश देशमुख नेमकं कशाबद्दल बोलणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचा ‘भाऊचा धक्का’ थोडा खास असणार आहे. आज रितेश देशमुखबरोबर दोन पाहुणे येणार आहेत. हे दोन्ही पाहुणे ‘बिग बॉस मराठी’च्या आधीच्या पर्वात स्पर्धक होते. शो सुरू झाल्यापासून हे दोघेही सोशल मीडियावर स्पर्धकांबद्दल आपापली मत मांडत आहेत, अशातच ते आज रितेशबरोबर आल्यावर नेमके कोणत्या स्पर्धकाचा समाचार घेणार की कोणाची बाजू घेणार हे पाहायला मिळेल. इंडेमॉल शाइन इंडियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये या दोघांची झलक पाहायला मिळतेय.
बिग बॉसमध्ये कोण येणार?
तुम्ही विचार करत असाल की नेमकं कोण बिग बॉसमध्ये येणार? तर हे दोन पाहुणे आहेत जय दुधाणे (Jay Dudhane) व उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde). हे दोघेही ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात होते. जय दुधाणेने या शोमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. तर उत्कर्ष शिंदेदेखील तिसऱ्या पर्वात होता. या व्हिडीओवर योगिता चव्हाणचा पती सौरभ चौघुलेने कमेंट करत ‘आता खरा कल्ला होणार…’ असं लिहिलं आहे.
उत्कर्षने सुरजला दिलेला पाठिंबा
उत्कर्ष शिंदे अनेकदा सुरज चव्हाणची बाजू घेताना दिसतो, त्याला पाठिंबा देताना दिसतो. गेल्या आठवड्यात सुरज घरातील केर काढत होता तेव्हाही उत्कर्षने कमेंट केली होती. “ही ड्यूटी नको, ती ड्यूटी नको, कधी बोलला ❌ शिक्षण नसूनही कधी भाषेत माज, दुसऱ्यांचा अपमान दिसला?❌ कोणाबद्दल वाईट गॉसिप करताना दिसला? ❌ कोणत्या मुलीचा अपमान केला?❌ गेममध्ये टिकण्यासाठी खोटं प्रेमाचं नाटक, रडणं, रुसणं, फुगणं, असं काही एक केलं का ❌ एकटा राहतो, एकटा खेळतो, एकटा भिडतो, एकटा नडतो, आणि एकटाच पुढे पण असणार, दिसणार” असं उत्कर्षने लिहिलं होतं.
हा शो सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात जयने पोस्ट करत निक्कीला वाईट स्पर्धक म्हटलं होतं, तसेच त्याने अभिजीत सावंतचं कौतुक केलं होतं. शो सुरू झाल्यापासून उत्कर्ष या शोबद्दल पोस्ट करून किंवा प्रोमोवर कमेंट्स करून व्यक्त होत आहे, दुसरीकडे जय देखील या शोबद्दल पोस्ट शेअर करत असतो. अशातच आता दोघेही ‘भाऊच्या धक्क्या’वर येणार आहेत, त्यामुळे आजचा एपिसोड खूपच रंजक ठरेल हे मात्र नक्की.