बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात असतात. अमिताभ बच्चन सध्या टेलिव्हिजनवरील सुपरहिट शो ‘कौन बनेगा करोडपती’चे १५ व्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहे. मात्र, एकेकाळी जया बच्चन यांनी अमिताभ यांना केबीसी होस्ट करण्यासाठी मनाई केली होती. अमिताभ बच्चन यांचे केबीसी होस्ट करणे जया बच्चन यांना पसंत नव्हते. काय होतं त्या मागच कारण? घ्या जाणून
अमिताभ बच्चन यांना चित्रपटांमध्ये चांगल्या भूमिका मिळत नव्हत्या आणि कोणत्याही अभिनेत्याने मोठा पडदा सोडून छोटय़ा पडद्यावर येणं हा मोठा धोका मानला. पण अमिताभ यांनी तो धोका पत्करला. याच कारणामुळे त्यांनी कौन बनेगा करोडपती या गेम शोमधून टीव्हीकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा या शोची संकल्पना अमिताभ बच्चन यांना समजावून सांगितली तेव्हा त्यांनी याला होकार दिला कारण त्यांना या शोसाठी चांगली रक्कम मिळाली होती.
त्या काळात लोक चित्रपटांच्या तुलनेत टीव्हीला खूपच लहान माध्यम मानत होते. मात्र, अनेकांनाच नाही तर अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांनाही त्यांच्या टेलिव्हिजनमध्ये काम करण्याच्या निर्णयावर आनंद झाला नाही. एका मुलाखतीत जया बच्चन यांनी खुलासा केला होता की, जेव्हा अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनय कारकिर्दीच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात होते तेव्हा त्यांना ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करण्याची ऑफर मिळाली. पण अमिताभ यांनी ही स्वीकारलेली ऑफर जया बच्चन यांना पटली नाही त्यांच्या मते हे व्यासपीठ एक अभिनेता म्हणून त्यांच्या प्रतिमेला अनुरूप नव्हते.