‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘जीव माझा गुंतला’. याच मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंतरा-मल्हार जोडी सुपरहिट झाली. या मालिकेनंतर अंतरा-मल्हार म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले वास्तवात आयुष्यभराचे जीवनसाथी झाले. ३ मार्च २०२४ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर योगिता आणि सौरभने स्वतःच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला आहे. ही आनंदाची बातमी सौरभने त्याच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता सौरभ चौघुलेने नव्या घरात गृहप्रवेश करताचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये सौरभ योगितासह हक्काच्या घरात गृहप्रवेश करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये नव्या घराची नेमप्लेट पाहायला मिळत आहे. या नेमप्लेटमध्ये सौरभ आणि योगिता असं दोघांचं नाव लिहिलं आहे. नव्या घराच्या गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत सौरभने लिहिलं, “एक स्वप्न आपलं, एकत्र पूर्ण करूया, नवीन शहरात, नवीन संसार थाटूया…आमच्या नव्या सुरुवातीसाठी चेअर्स” याशिवाय त्याने फोटो शेअर करताना पवई लोकेशन मेन्शन केलं आहे. याचाच अर्थ योगिता आणि सौरभचं नवं घर पवईत आहे.

हेही वाचा – कालीन भैय्या आणि गुड्डू पंडितची आतुरतेने पाहताय वाट, तर ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख दडलीये ‘या’ फोटोमध्ये, शोधा

हेही वाचा – प्रदर्शनापूर्वीच आमिर खानच्या लेकाचा ‘महाराज’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, बजरंग दलने घेतला आक्षेप, जाणून घ्या कारण…

सौरभ चौघुलेने शेअर केलेल्या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी दोघांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री सुमेधा दातार, अमोल नाईक, साक्षी गांधी, पूर्णिमा डे, आरती बिराजदार अशा अनेक कलाकारांनी दोघांच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘पुष्पा २’मधील ‘अंगारों’ आणि निळू फुलेंच्या गाण्याचं मॅशअप पाहिलंत का? त्यांची लेक गार्गी फुले पाहून म्हणाल्या, “कमाल…”

दरम्यान, योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘जीव माझा गुंतला’ नंतर योगिता कुठल्याही मालिकेत झळकली नाही. पण काही महिन्यांपूर्वी ती सौरभसह एका गाण्यामध्ये पाहायला मिळाली. तर सौरभ ‘जीव माझा गुंतला’ मालिकानंतर ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ मालिकेत दिसला. या मालिकेत अभिनेत्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच त्याची ‘सुंदरी’ मालिकेतून एक्झिट झाली. यावेळी सौरभने सोशल मीडियावर खास सुंदर पोस्ट लिहिली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeev majha guntala fame actress yogita chavan and saurabh choughule bought new house pps