Saorabh Choughule & Yogita Chavan : योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले या दोघांनी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर यांची ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र आली. गेल्यावर्षी मार्च महिन्यात योगिता-सौरभने आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. यानंतर अभिनेत्री बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आली होती.

योगिता आणि सौरभचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकतंच हे जोडपं लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी इंडोनेशियातील बाली येथे गेलं होतं. याचे बरेच फोटो आणि व्हिडीओ या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. योगिता आणि सौरभची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. हे दोघं दैनंदिन आयुष्यातील मजेशीर गोष्टींचे व्हिडीओ देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.

सध्या सौरभ मेथीची भाजी निवडत असलेला व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे. सौरभ आणि योगिता दोघंही इंडस्ट्रीत सक्रिय असल्याने हे दोघंही घरची जबाबदारी मिळून सांभाळतात. या व्हिडीओमध्ये सौरभ भन्नाट ट्रिक वापरून मेथीची भाजी निवडत असल्याचं पाहायला मिळत आहे. नवऱ्याचा हा जुगाड पाहून योगिता सुद्धा थक्क झाली आहे.

मेथीची भाजी निवडण्यासाठी सौरभचा हटके जुगाड…

योगिता – काय करतो आहेस सौरभ?

सौरभ – तू मला सांगत असतेस ना…इन्स्टाग्रामवर तू काय करत असतोस? सोशल मीडियावर मी हे हॅक पाहिलं. आता ती ट्रिक प्रत्यक्षात शक्य आहे की नाही हे मी बघतोय…एक झारा घ्यायचा कारण, मेथीची भाजी निवडण्याचं काम हे खूप कंटाळवाणं असतं. झाऱ्यात एक-एक मेथीचे देठ टाकायचे आणि दुसऱ्या बाजूने ओढायचे. मला आधी वाटलं होतं अरे यापेक्षा आपण मेथी साफ वगैरे करुया…पण, हेच सोपं आहे. हे बघ…सगळे देठ एका बाजूला येतात.

योगिता – वाह वाह, व्हेरी गूड

सौरभ – पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकतो…इन्स्टाग्रामवर फक्त रील्स बघू नका मेथी निवडायला शिका…संसार, घेतलेल्या उखाण्यावर खरा उतरलो…भाजीत भाजी मेथीची योगिता माझ्या प्रीतीची

दरम्यान, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेक. किशोरी अंबिये यांनी यावर, “वाह वाह तुझा अभिमान वाटतोय” अशी कमेंट सौरभसाठी करत पुढे हसण्याचे इमोजी दिले आहेत. तर अन्य नेटकऱ्यांनी, “आवडती बायको मिळाली का माणूस सर्व कांही शिकतो”, “तुम्ही दोघं आणि तुमची केमिस्ट्री जबरदस्त”, “सौरभ मॅकेनिकल इंजिनीअर आहे”, “एकच नंबर…”, “अरे संसार संसार” अशा कमेंट्स या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत.

Story img Loader