‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हार-अंतराची ऑनस्क्रीन जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांचा विवाहसोहळा ३ मार्चला थाटामाटात पार पडला होता. लग्नसोहळा पार पडल्यावर योगिता-सौरभ हनिमूनला गेले होते. हे जोडपं मुंबईत परतल्यावर विमानतळावर यांची बॉलीवूड पापाराझींनी खास विचारपूस केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवरील बहुतांश पापाराझी पेजेसवरून बॉलीवूड कलाकारांचे विमानतळावरील अनेक फोटो व व्हिडीओ शेअर केले जातात. अशातच सध्या ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मुंबईत परतलेल्या योगिता आणि सौरभ या मराठमोळ्या सेलिब्रिटी जोडप्याचा साधेपणा हिंदी प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांना नेमकं काय झालंय? आता प्रकृती कशी आहे? माहिती आली समोर

योगिता-सौरभचा मुंबई विमानतळावरील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मराठी मालिकेत काम केलेल्या या लोकप्रिय जोडीची हिंदी प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली आहे. दोघांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओमध्ये सौरभ-योगिता पापाराझींशी हसत-खेळत संवाद साधत असल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय दोघांनी एकत्र माध्यमांसमोर पोज दिल्या.

हेही वाचा : ‘सिद्धार्थ सीमा चांदेकर’, अभिनेत्याने सांगितलं आईचं नाव लावण्यामागचं कारण; म्हणाला…

yogita
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

“मराठी जोडी”, “किती गोड जोडी आहे”, “जीव गुंतला मालिकेतील कलाकार”, “मी यांना ओळखत नाही पण, खरंच हे दोघेही एकत्र खूप छान दिसत आहेत” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी सौरभ योगिताच्या व्हायरल व्हिडीओवर केल्या आहेत.

Story img Loader