गेल्या काही वर्षांत छोट्या पडद्यावरच्या अनेक रील जोडप्यांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधल्याचं आपण पाहिलंय. तितीक्षा-सिद्धार्थ, हार्दिक-अक्षया, शिवानी-अजिंक्य या सगळ्या जोडप्यांनी आधी मालिकेत एकत्र काम केलं आणि त्यानंतर रीअल आयुष्यातील प्रवास सुरू केला. मार्च महिन्यात अशीच एक प्रेक्षकांची लाडकी जोडी विवाहबंधनात अडकली या जोडीचं नाव आहे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगिता-सौरभने एकत्र काम केलं होतं. यामध्ये योगिताने ‘अंतरा’, तर सौरभने ‘मल्हार’ हे पात्र साकारलं होतं. या दोघांच्या लव्हस्टोरीला नेमकी कधी सुरुवात झाली? याबाबत दोघांनी राजश्री मराठीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. योगिता म्हणाली, “आम्हा दोघांची पहिलीच लीड मालिका होती. त्यामुळे सुरुवातीला आपल्या शोला पुढे न्यायचंय ही एकच भावना मनात होती. जेव्हा आमचा शो ट्रॅकवर आला तोपर्यंत आम्ही दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो होतो.”

हेही वाचा : Video : सई ताम्हणकरने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी! लेकीचा आनंद पाहून आई भारावली

अभिनेत्री पुढे म्हणाली, “आम्ही मालिकेच्या लूक टेस्टसाठी सर्वात आधी भेटलो. तीन वर्षांपूर्वी १० मे रोजी आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. डेटिंगबद्दल सांगायचं झालं, तर एकमेकांना डेट करून आतासं फक्त एक वर्ष झालं असेल किंवा त्यापेक्षाही कमी…आमचे एकत्र रील्स, व्हिडीओ वगैरे पाहून काही लोकांनी आधीच आमचं काहीतरी आहे असा अंदाज बांधायला सुरुवात केली होती. त्यामुळे जेव्हा खरंच रिलेशनशिपमध्ये आलो तेव्हा आम्ही हळुहळू रील्स टाकणं कमी केलं होतं. आम्ही पहिल्यापासून शूटसाठी एकत्र होतो त्यामुळे सौरभने प्रपोज केल्यावर असं काही वेगळं नाही वाटलं. पण, मी नीट वेळ घेऊन त्याला माझ्या भावनांबद्दल सांगितलं. आमचं बॉण्डिंग आधी आणि नंतर अगदी सारखंच राहिलं.”

हेही वाचा : Video : सलमान खानच्या गाण्यावर वनिता खरात अन् पृथ्वीक प्रतापचा ऑस्ट्रेलियात जबरदस्त डान्स! व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

पुढे लग्नाबद्दल सांगताना सौरभ याबद्दल म्हणाला, “आम्ही डेट करायला लागल्यावर डिसेंबर २०२४ पर्यंत लग्न करूया असं मी ठरवलं होतं. पण, अचानक एकेदिवशी मला हिचा फोन आला आणि ती म्हणाली आपण लग्न करूया. त्यानंतर सगळ्यांच्या तारखा जुळवून आम्ही ३ मार्च ही तारीख ठरवली. यात आमची मॅनेजर तेजस्वीने खूप मदत केली.” दरम्यान, सौरभ आणि योगिताने गेल्या महिन्यात जवळचे नातेवाईक व कलाविश्वातील निवडक मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeev majha guntala fame yogita chavan and saorabh choughule reveals their love story sva 00