योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची जोडी ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. मालिका संपल्यावर या रील जोडीने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधत सर्वांना सुखद धक्का दिला होता. ३ मार्चला विवाहबंधनात अडकल्याचा फोटो शेअर करत योगिता-सौरभने रीअल आयुष्यात ‘हमसफर’ झाल्याचं चाहत्यांना सांगितलं.
लग्नबंधनात अडकल्यावर हळुहळू या दोघांनी सर्व विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या लग्नाला अलीकडेच एक महिना पूर्ण झाल्यावर या जोडप्याने खास विवाहसोहळ्यातील Unseen व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या व्हिडीओमध्ये चाहत्यांना त्यांच्या हळद, संगीत सेरेमनची झलक पाहायला मिळत आहे. परंतु, अद्याप योगिता किंवा सौरभने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले नव्हते किंवा तारीखही सांगितली नव्हती.
हेही वाचा : शॉर्ट वनपीस अन्…; सायलीने अर्जुनसाठी बदलला लूक, ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो
योगितने नुकतीच शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. यामध्ये अभिनेत्री साखरपुड्याचे फोटो शेअर करत हा सोहळा केव्हा पार पडला होता याची तारीख सांगितली आहे. योगिता आणि सौरभचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्याच्या ११ तारखेला पार पडला होता. कारण, अभिनेत्रीने फोटो शेअर करत त्यावर “साखरपुडा ११.०२.२०२४” असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, साखरपुडा सोहळ्याला योगिताने सुंदर अशी लाल रंगाची साडी नेसून त्यावर मल्टीकलर ब्लाऊज परिधान केला होता. तर, सौरभने शेरवानी परिधान केली होती. सध्या चाहते त्यांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.