‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी गेल्या महिन्यात ३ मार्च रोजी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत या जोडप्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आज त्यांच्या लग्नाला बरोबर १ महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्ताने योगिताने लग्नातील खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री आईच्या आठवणीत भावुक होत लाडक्या नवऱ्याचं कौतुक करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगिता आणि सौरभ यांनी ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. मालिकेने निरोप घेतल्यावर या जोडप्याने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणते, “सहा महिन्यांपूर्वी माझी आई मला सोडून गेली. मी नेहमी असं सांगते की, माझ्या आईनेच सौरभला माझ्या आयुष्यात पाठवलं आहे. माझी काळजी घेण्यासाठी तो कायम माझ्याबरोबर आहे.” हे सांगताना अभिनेत्री भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावर “मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन” असं म्हणत सौरभने तिला धीर दिला.

हेही वाचा : लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण! पहिल्या नाटकाबद्दल अभिनय म्हणाला, “आज आईबाबांच्या आशीर्वादाने…”

व्हिडीओच्या शेवटी सौरभ आणि योगिताने त्यांच्या मालिकेचं “माळरानी तुझ्यात जीव माझा गुंतला…” हे शीर्षक गीत गायल्याचं पाहायला मिळत आहे. “बरोबर एक महिना आधी ‘माझं’ आणि ‘मी’च ‘आमचं’ आणि आता ‘आपलं’ झालं…#foreverhumsafar” असं कॅप्शन या दोघांनी या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा : Video : पंजाबी गाण्यावर एन्ट्री, फुलांची उधळण अन्…; तापसी पन्नूच्या सिक्रेट लग्नातील पहिला व्हिडीओ आला समोर

दरम्यान, योगिता आणि सौरभ ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकले होते. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २०२१ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पुढे जवळपास दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यामध्ये योगिताने अंतरा, तर सौरभने मल्हार हे पात्र साकारलं होतं. मालिकेने निरोप घेतल्यावर आता ही जोडी खऱ्या आयुष्यात देखील एकत्र आली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeev majha guntala fame yogita chavan and saorabh choughule shares unseen video of wedding sva 00