सध्या जुन्या मालिका बंद होऊन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अशातच ‘कलर्स मराठी’ वाहिनीने जुन्या मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी अत्यंत गाजलेली मालिका ‘जीव झाला वेडापिसा’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. हो, हे खरं आहे. सिद्धी आणि शिवाची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.
“आठवणींच्या सोनेरी पानावर पुन्हा भेटणार सिद्धी आणि शिवा”, असं कॅप्शन लिहित ‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावरून ही प्रेक्षकांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. ३ एप्रिल २०२१ रोजी ‘जीव झाला वेडापिसा’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. ५३५ भागांचा टप्पा पूर्ण करून या मालिकेचा प्रवास थांबला होता. पण आता हा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे.
छोट्या पडद्यावर ही गाजलेली मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. आजपासून (२२ जानेवारी) सकाळी ११ वाजता या मालिकेचं प्रक्षेपण होतं आहे. त्यामुळे या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणी आहे.
हेही वाचा – अयोध्येतील राम मंदिर पाहताच प्रसिद्ध संगीतकाराच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले…
दरम्यान, ‘जीव झाला वेडापिसा’ व्यतिरिक्त ‘कलर्स मराठी’ मराठीवर आजपासून ‘तू माझा सांगाती’ ही देखील मालिका सुरू आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर याची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका आजपासून सकाळी ९ वाजता प्रसारित होतं आहे.