‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतून मराठी मनोरंजनसृष्टीतला एक नवी जोडी मिळाली, ती म्हणजे सिद्धी-शिवाची. मालिकेतील ही जोडी सुपरहिट ठरली. सलग दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता या मालिकेतील कलाकार नव्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. लवकरच शिवा म्हणजे अभिनेता अशोक फळदेसाईची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या मालिकेत तो एका प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झळकणार आहे.

अभिनेता अशोक फळदेसाई काही महिन्यांपूर्वीच एका मराठी मालिकेत पाहायला मिळाला होता. ‘कस्तुरी’ या असं मालिकेचं नाव होतं. २६ जूनला सुरू झालेली ही मालिका अवघ्या तीन महिन्यातच गुंडाळण्यात आली. मालिकेला टीआरपी नसल्यामुळे ‘कस्तुरी’ ही मालिका अचानक ऑफ एअर करण्यात आली. या मालिकेत अशोक समर कुबेरच्या भूमिकेत झळकला होता. आता नव्या भूमिकेतून आणि नव्या मालिकेतून अशोक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याबाबतची माहिती ‘मराठी टेल बज’ या इन्स्टाग्रामवर पेजवर शेअर करण्यात आली आहे.

हेही वाचा – Video: ‘ओम शांती ओम’ गाण्यावर थिरकलं बॉलीवूड, अमिताभ बच्चनसह शाहरुख खानने लावली हजेरी, काय होता नेमका कार्यक्रम?

अशोक फळदेसाई आता ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ आणि ‘छोटी मालकीण’ यांसारख्या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्री एतशा संझगिरीबरोबर पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच नव्या मालिकेतून अशोक व एतशा एकत्र काम करणार आहे. या नव्या मालिकेचं नाव ‘निवेदिता माझी ताई’ असं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच ही आगामी नवी मालिका कोणत्या वाहिनीवर प्रसारित होणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा – Photos: मुक्ता-सागरच्या संगीतला ‘स्टार प्रवाह’ परिवारातील खास पाहुण्यांची हजेरी; करणार ‘या’ गाण्यांवर डान्स

दरम्यान, लवकरच ‘झी मराठी’वर ‘जाऊ बाई गावात’नंतर आणखी एक नवीन रिअ‍ॅलिटी शो सुरू होणार आहे. ‘ड्रामा Juniors’ असं नव्या रिअ‍ॅलिटी शोचं नाव आहे.

Story img Loader