Jhalak Dikhla Jaa 11 contestant list : अमरावतीच्या शिव ठाकरेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘रोडीज’च्या १४ व्या पर्वापासून तो घराघरांत लोकप्रिय झाला. स्वत:मधील खरेपणा आणि उत्तम टास्कच्या जोरावर शिवने ‘रोडीज’च्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर ‘बिग बॉसमराठी’मुळे रातोरात त्याच नशीब उजळलं. शिव ठाकरे ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. कालातरांने हिंदी ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमांमधून त्याने स्वत:चा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. आता लवकरच एका नव्या शोमधून शिव प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
हेही वाचा : “मुंबईका किंग कौन…” हंसल मेहतांच्या ‘स्कॅम २००३ – तेलगी स्टोरी’च्या पार्ट २ चा टीझर प्रदर्शित
‘बिग बॉस’मुळे शिवला सर्वत्र ‘आपला माणूस’ ही नवी ओळख मिळाली. प्रेक्षकांचा लाडका ‘आपला माणूस’ आता नव्या शोमध्ये एन्ट्री घेण्यास सज्ज झाला आहे. शिव लवकरच ‘झलक दिखला जा’च्या ११ व्या पर्वात सहभागी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘झलक दिखला जा’च्या नव्या पर्वाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. शिवसह या शोमध्ये कोण-कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार? जाणून घेऊया…
हेही वाचा : Video : “तुम्हाला रील बनवण्याचे पैसे दिले नाही” प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर वैतागला दिग्दर्शक, कारण…
‘झलक दिखला जा’च्या ११ व्या पर्वातील निश्चित १० स्पर्धकांची नाव नुकतीच समोर आली आहेत. ‘ससुराल सिमर का’ फेम शोएब इब्राहिम, ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता शिव ठाकरे, उर्वशी ढोलकिया, आमिर अली, तनीषा मुखर्जी, संगीता फोगाट, अंजली आनंद, राघव ठाकूर, करूणा पांडे, अदरीजा सिन्हा हे सेलिब्रिटी यंदाच्या पर्वात झळकणार आहेत.
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून होतंय कौतुक; नेटकरी म्हणतायत, “माणुसकी शिल्लक आहे”
‘झलक दिखला जा’मध्ये शिवचा कोरिओग्राफर रोमेश सिंह असणार आहे. शिवने त्याच्या करिअरची सुरूवात डान्सपासून केली होती. स्वत:चे डान्स क्लास असल्यामुळे त्याला याबाबत प्रचंड माहिती आहे. त्यामुळे अर्थातच शिव ठाकरेने हे ‘झलक दिखला जा’चं हे पर्व जिंकावं अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. दरम्यान, हा शो ११ नोव्हेंबरपासून सोनी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.