Jitendra Awhad For Suraj Chavan : बारामतीजवळच्या मोढवे गावातील सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने (Bigg Boss Marathi winner Suraj Chavan) बिग बॉस मराठी ५ ची ट्रॉफी जिंकली. अतिशय गरीब कुटुंबातील सूरजने बिग बॉसच्या या ७० दिवसांच्या प्रवासात आपल्या साधेपणाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्याला प्रेक्षकांचं मतांच्या रूपात प्रेम मिळालं आणि तो या शोचा विजेता ठरला. सूरज चव्हाणसाठी राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी सूरजचं अभिनंदन केलं. तसेच त्याचा संघर्ष पोस्टच्या माध्यमातून सांगितला. एकेकाळी मंदिरातील नारळ खाऊन भूक भागवणारा सूरज आता बिग बॉसचा विजेता ठरला असून त्याने १४.६ लाख रुपये रोख रक्कम आणि इतर बक्षिसं जिंकली आहेत. सूरजने या शोची ट्रॉफी जिंकणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
हेही वाचा – सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi 5 जिंकल्यावर प्रवीण तरडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
“आपल्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोढवे गावचा आई मरी मातेच्या मंदिराबाहेर उभा राहून दिवसातून तीन वेळा डोकावून पाहायचा हा पोरगा.. की नीवद (नैवद्य) नारळ आलेत का माझ्या पुढं.. ते आलेले दिसले की तो ते उचलून खायचा.. आपली भूक भागवायचा..
सुप्रसिद्ध रीलस्टार सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घातला. अखेर त्याने ट्रॉफी आपल्या पदरात पाडून घेतली. बिग बॉसच्या सुरुवातीपासूनच देशभर सूरजची क्रेझ वाढली होती आणि आता अधिकच वाढली आहे. बिग बॉस सारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये २७४ लोकांमधून अंतिम १६ मध्ये त्याची निवड होत अखेर विजयी होणं ही अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
जिंकलंस भावा… तुझं करावं तितकं कौतुक कमीच आहे,” अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा विजेता सूरज चव्हाणसाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, “आपल्या बारामतीचा…”
हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंतची पहिली पोस्ट; म्हणाला, “मला जे वाटतंय ते…”
सूरज चव्हाणला आई-वडील नाही. तो लहान असताना त्याचे वडील कॅन्सरने गेले, त्यांच्या जाण्याच्या धक्क्यातून आई सावरू शकली नाही आणि ती वेड्यासारखी वागू लागली होती. काही काळाने तीदेखील गेली. सूरजचा पाच बहिणी आहेत. त्याचं संगोपन मोठ्या बहिणीने केलं. आता बिग बॉसमध्ये जिंकलेल्या पैशातून घर बांधायचं आहे, असं सूरजने सांगितलं.