टीव्ही मालिका ‘उतरन’ व नुकतीच प्रदर्शित झालेल्या ‘जुबली’ वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता नंदिश सिंह संधूच्या भावाचं निधन झालं आहे. नंदिशने स्वतःच लहान भाऊ ओंकार सिंह संधूच्या निधनाची बातमी पोस्ट करून दिली आहे. नंदिशचा भाऊ ओंकार कर्करोगाशी झुंज देत होता. ओंकारने २८ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत नंदिशच्या भावावर अंतिम संस्कार झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुझं आयुष्य फक्त पार्टी आणि मुली…’, जिया खानने सुसाईड नोटमध्ये सूरज पांचोलीबद्दल केलेले खुलासे; म्हणालेली, “मला गरोदर…”

नंदिशने आपल्या इंस्टाग्रामवर चाहत्यांशी ही दुःखद बातमी शेअर केली. भाऊ ओंकार आता या जगात नसल्याचं नंदिशने त्याचे फोटो पोस्ट करत सांगितलं. ओंकारचा हसतमुख फोटो शेअर करून त्याने भावाला निरोप दिला. “अशा रितीने तू कायम आमच्या आठवणीत राहशील. नेहमी हसतमुख, आनंद पसरवणारा, आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असणारा तू खरा लढवय्या आहेस. छोट्या, पुन्हा कधीतरी भेटूया जगाच्या पलीकडे, तू आम्हा सर्वांना लढायला शिकवलंस, शेवटपर्यंत तेही हसतमुखाने. मी तुला माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस साजरा करण्याचे वचन देतो. R.I.P. ओंकार सिंह संधू”, असं कॅप्शन नंदिशने भावाच्या फोटोंना दिलं आहे.

नंदिशच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच इंडस्ट्रीतील त्याचे मित्रही कमेंट करून ओंकारला श्रद्धांजली वाहत आहेत. शरद मल्होत्रा, कृतिका कामरा, अर्जुन बिजलानी, भारती सिंग यांनी ओंकारला श्रद्धांजली वाहिली आहे. तर, अंकिता लोखंडेने कमेंट करत नंदिशला हिंमत ठेवण्यास सांगितलं.