तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका ४ सप्टेंबरपासून सुरू झाली. पण या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं. दोन विरोधी स्वभावाचे मुक्ता-सागर आणि त्यांचे कुटुंब कसे एकत्र आले हे आतापर्यंत पाहायला मिळालं. पण आता चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी मुक्ता-सागर बोहल्यावर चढणार असून लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांमधील प्रेम कसं बहरत हे आता पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या दोघांचा लग्नसोहळा थाटामाटात सुरू आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजच्या भागात उर्वरित संगीत सोहळा पाहायला मिळणार आहे. यामध्ये दोन गटांमध्ये डान्सची जुगलबंदी होणार आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील आनंदी-सार्थक, ‘पिंकीचा विजय असो’मधील पिंकी-युवराज, तसेच सई, मुक्ता-सागरचा डान्स पाहायला मिळणार आहे. या संगीत सोहळ्यानंतर मुक्ता-सागरचा हळद, सप्तपदीचा समारंभ मोठ्या दिमाखात होणार आहे. सप्तपदीच्या समारंभसाठी खास ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली-अर्जुन हजेरी लावणार आहे. यावेळी दोन्ही जोडप्यांमध्ये खास नातं दाखवलं जाणार आहे.

prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
kumar vishwas
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”
Who is PV Sindhu Husband Venkat Datta Sai Education IPL Delhi Capitals Wedding
PV Sindhu Wedding: कोण आहे पीव्ही सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई? आयटी व्यावसायिक ते ‘या’ IPL संघाशी आहे कनेक्शन
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”

हेही वाचा – Video: “वेडे आहात तुम्ही…”, सई ताम्हणकर, मिताली मयेकर अन् सिद्धार्थ चांदेकरचा व्हिडीओ पाहून कलाकारांच्या तुफान कमेंट्स

नुकताच सायली-अर्जुन म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांनी ‘लोकमत फिल्मी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी सायली-अर्जुनने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता-सागरबरोबर कोणतं नातं दाखवलं जाणार? याचा खुलासा केला. यावेळी अर्जुन (अमित) म्हणाला, “मी सागरचा एक खास मित्र म्हणून लग्नाला आलो आहे. तसेच सायली ही मुक्ताची खूप जवळची मैत्रिण आहे. पुढे सायली (जुई) म्हणाली, “मुक्ता माझ्या आश्रमातल्या मुलांवर मोफत उपचार करायची. त्यामुळे मी तिला शुभेच्छा देण्याबरोबर तिचे आभार मानले. मी म्हणाले, खरं खूप थँक्यू. कारण तू माझ्या मुलांवर प्रेमाने उपचार केले.”

हेही वाचा – Premachi Goshta: “नौका घेऊन निघालो दर्याकाठी…”, मुक्ता-सागरने एकमेकांसाठी घेतले भन्नाट उखाणे

पुढे जुई लग्नातल्या सीनविषयी म्हणाली, “मला वाटलं, हाय, हॅलो, लग्नाचा शुभेच्छा एवढं करायचं असेल. पण चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला या कथेमध्ये सामावून घेतलं. आम्ही प्रॉपर सीन केलेत. मुक्ताचा आणि माझा भलामोठा सीन झालाय.”

Story img Loader