‘पुढचं पाऊल’, ‘वर्तुळ’ व आता ‘ठरलं तर मग’ या मालिकांमधून अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत लोकप्रिय झाली. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी जुई स्टार प्रवाहवरील महामालिकेत सध्या प्रमुख भूमिका साकारतेय. इंडस्ट्रीत आल्यापासून ते यशाचं शिखर गाठण्यापर्यंतचा जुईचा हा प्रवास काही सोपा नव्हता. सिनेसृष्टीतील कलाकारांच्या आयुष्यात अनेक चांगले-वाईट अनुभव येतात आणि असे अनुभव आयुष्यभर लक्षात राहतात. जुईच्या आयुष्यातही असा एक वाईट अनुभव होता; जिथे तिला स्वत:बरोबर पिस्तूल बाळगण्याची वेळ आली होती.

नुकत्याच ‘कॉकटेल स्टुडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत जुईनं याबाबत खुलासा केला आहे. जुई म्हणाली, “२०१४ ला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला जीवे मारण्याची धमकी आली होती आणि माझ्या कर्जतच्या घरी दोन पत्रं आली होती. त्यात असं लिहिलं होतं की, आम्ही २१ जुलैला जुईला मारून टाकणार आहोत. तर माझा स्वभाव बघता, मी काय घाबरले वगैरे नव्हते. मला कळलं होतं की, मारायचं असतं, तर एखाद्यानं थेट येऊन मारलं असतं, त्या व्यक्तीनं अशी पत्रं पाठवली नसती. हे पत्र वगैरे पाठवणं मला थोडंसं ‘फिल्मी’ वाटतं, आधी पत्र पाठविणार आणि मग २१ तारखेला मला मारणार म्हणजे हे कळल्यावर मी २१ तारखेला जशी काय बाहेर फिरणारच आहे.”

sai tamhankar bus incident
“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Hina khan diagnosed with breast cancer
Hina Khan Cancer: अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान, पोस्ट शेअर करत म्हणाली…
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Amla Paul
“भर उन्हात तिने आम्हाला व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर काढले”, हेअर स्टायलिस्टने सांगितला प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर काम करण्याचा अनुभव
Nana Patekar talks about manisha koirala
एकेकाळी अफेअरच्या चर्चा, आता मनीषा कोईरालाबद्दल विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “तिचा फोन नंबर…”

हेही वाचा… लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षी सिन्हा पती झहीर इक्बालबरोबर गेली डिनर डेटला; मेहेंदीवरून नेटकऱ्यांनी केली शंका व्यक्त, म्हणाले…

जुई पुढे म्हणाली, “त्यादरम्यान एसीपी लक्ष्मी नारायण सर यांनी मला सांगितलं की, तू अभिनेत्री आहेस. तुला एकटीला फिरावं लागतं. तेव्हा तू पिस्तूलच्या लायसन्ससाठी अर्ज करू शकतेस आणि तुझं वय खूप कमी असल्यानं जर तो अर्ज मंजूर झाला, तर पुढे काय करायचं ते बघू. पण, सध्या अशी परिस्थिती आहे की, तुला लायसन्स पिस्तूल मिळू शकतं. मग मी त्या पिस्तूलसाठी अर्ज भरला आणि पाच दिवसांतच मला मंजुरी मिळाली. त्यानंतर मी लायसन्स पिस्तूल घेतली.”

“मी पिस्तूल हाताळण्यासाठी सराव केला. तेव्हा माझ्याबरोबर सहा महिने बॉडीगार्ड होते. कारण- तेव्हा कधीही काहीही होऊ शकलं असतं. मी पिस्तूल कसं हाताळायचं हे शिकून घेतलं. माझ्या कुटुंबानं त्यादरम्यान मला खूप सपोर्ट केला. पोलिसांनी सांगितलं की, हे पिस्तूल तुझ्या स्वसंरक्षणासाठी आहे. ही खूप महत्त्वाची जबाबदारी आहे”, असंही जुई म्हणाली.

हेही वाचा… “मांजरीची तीन पिल्लं गाडीच्या बोनेटमध्ये…”, ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला धक्कादायक प्रसंग, म्हणाल्या…

जुई पुढे म्हणाली, “मला आजही वाटतं की, ज्या व्यक्तीनं मला ते पत्र पाठवलं होतं, त्याला हे माहीतही नसेल की, या गोष्टीला एवढं मोठं रूप आलं असेल. कोणाला कधी कधी नुसतीच धमकी द्यायची असते की, एक गंमत करून बघूया आणि त्याचं इतकं मोठं रूप होतं. ही पिस्तूल वापरायची माझ्यावर कधी वेळ आली नाही आणि येऊही नये, असं मला वाटतं.”