‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने साकारलेलं कल्याणी हे पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. सध्या जुईच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गेली वर्षभर ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे. आज मालिकाविश्व गाजवणारी ही दमदार अभिनेत्री एकेकाळी महाविद्यालयात असताना नापास झाली होती. नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने कॉलेजच्या जीवनातील बऱ्याच आठवणी सांगितल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाळेत असताना जुईला अभ्यासाची फारशी आवड नव्हती. कॉलेजमध्ये तिने अभ्यासाहून अधिक गाण्यांच्या कार्यक्रमांना प्राधान्य दिलं. याविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली, “माझे शाळेचे दिवस फार वाईट होते कारण, मला अभ्यास करायला कधीच आवडायचं नाही. मला दहावीत सुद्धा फक्त ५८.८० टक्के गुण मिळाले होते. तेव्हा मला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची खूप इच्छा होती. याचं कारण म्हणजे मला व्हेटर्नरी सर्जन व्हायचं होतं. माझं प्राणीप्रेम सर्वांनाच माहिती आहे. पण, ५८ टक्क्याला सायन्ससाठी मला कोणत्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता. शेवटी माझ्या आईने कॉमर्स केलेलं म्हणून तिने कॉमर्सला प्रवेश घे असं मला सांगितलं.”

हेही वाचा : लग्नाआधी पूजा सावंतने दिलं मोठं सरप्राईज! ‘या’ बॉलीवूड अभिनेत्यासह शेअर केली स्क्रीन, व्हिडीओ व्हायरल

जुई पुढे म्हणाली, “माझ्याकडे गाण्याच्या विविध स्पर्धांची प्रमाणपत्र असल्याने मला सीएचएम कॉलेजमध्ये सांस्कृतिक कोट्यामधून प्रवेश मिळाला. कॉलेजमध्ये मी सांस्कृतिक विभागात सहभाग घेतला होता. कॉलेज सुरू झाल्यावर पुढे वर्षभर माझे गाण्यांचे कार्यक्रम सुरू होते. मी वर्गात तासिकांना अजिबात बसायचे नाही. अकरावीत असताना मला ६७ टक्के मिळाले पण, गणित विषय राहिल्याने मी नापास झाले होते. गणितात १०३ पैकी मला फक्त ३ गुण मिळाले होते. तेव्हा माझ्या एका सरांनी आई-बाबांची समजूत काढली. त्यांनी जुई बाहेरून बारावी पूर्ण करेल असं आश्वासन माझ्या घरी दिलं.”

हेही वाचा : “कर्करोग म्हणजे विनोद नाही”, पूनम पांडेच्या पब्लिसिटी स्टंटमुळे अभिज्ञा भावे संतापली; म्हणाली, “अशा लोकांना…”

“माझ्या सरांच्या सांगण्यानुसार मी बारावी बाहेरून दिली…अभ्यास करून अगदी छान पास झाले. बारावीचा निकाल लागल्यावर मी माझ्या आवडीच्या शाखेत प्रवेश घेतला ती शाखा म्हणजे बीएमएम (BMM). सगळं आवडीनुसार केल्यामुळे पुढे, पदवीच्या शेवटच्या वर्षात मी विद्यापीठातून पहिली आले होते. आयुष्यात आवडीच्या गोष्टी मिळाल्यावर मी सगळं छान करू शकते. अन्यथा मी खूप हट्टी मुलगी आहे. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मी पदव्युत्तर पदवी परीक्षा पास केली, एमबीए केलं पुढे सगळं छान झालं.” असं जुई गडकरीने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jui gadkari failed in 11th standard in mathematics subject reveals in recent interview sva 00