जुई गडकरीला मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. सध्या ती ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिची ही मालिका गेल्या दीड वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे. त्यामुळे जुईचा चाहतावर्ग सुद्धा गेल्या काही वर्षांत वाढला आहे. या मालिकेत अभिनेत्रीने सायली हे पात्र साकारलं आहे. जुई गेली अनेक वर्षे छोट्या पडद्यावर काम करतेय. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिचे अनेक फॅन पेजेस तयार केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलाकारांना अनेकदा सोशल मीडियाचे वाईट अनुभव येतात. कधी धमक्या दिल्या जातात, तर कधी सेलिब्रिटींच्या नावाने खोटी अकाऊंट्स बनवून त्यांच्या चाहत्यांची फसवणूक केली जाते. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री जुई गडकरीला आला आहे. याबाबत स्क्रीनशॉट शेअर करत तिने माहिती दिली आहे.

हेही वाचा : Video : ‘डान्स दीवाने’मध्ये माधुरी दीक्षितने चिमुकलीसह केला जबरदस्त डान्स; बायकोसाठी डॉ. नेनेंनी मारल्या शिट्ट्या

जुई गडकरीच्या नावाने एका युजरने बनावट अकाऊंट ओपन केलं आहे. एवढंच नव्हे तर संबंधित नेटकरी तिच्या चाहत्यांशी जुईच्या नावाने चॅटिंग करून त्यांची फसवणूक करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. सोशल मीडियावर याचा स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्री लिहिते, “एखाद्या सेलिब्रिटीचं फॅनपेज बनवणं वाईट नाही. परंतु, बनावट पेज बनवून माझ्या नावाने खोटं चॅटिंग करून फसवणूक करणं हे खूपच चुकीचं आहे. कृपया या अकाऊंटवर कोणालाही उत्तर देऊ नका…प्लीज रिपोर्ट या अकाऊंटला रिपोर्ट करा.”

हेही वाचा : “मिस यू आई…”, प्रिया बापटने आईच्या आठवणीत गायलं खास गाणं, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

“माझं खरं अकाऊंट ब्लू टिक व्हेरिफाईड आहे आणि माझं युजरनेम @ juigadkariofficial असं आहे.” असं अभिनेत्रीने हा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच जुईला एका तरुणीकडून सोशल मीडियावर धमकी मिळाली होती. तेव्हा देखील अभिनेत्रीने संतप्त होऊन या मेसेजचे स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

हेही वाचा : चार वर्षांनी भारतात परतलेली मृणाल दुसानिस सध्या काय करते? म्हणाली, “ठाण्याला शिफ्ट होऊन…”

‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीची पोस्ट

हेही वाचा : Video : ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’च्या मंचावर ‘नाच गं घुमा’! भरत जाधव, अलका कुबल यांचा जबरदस्त डान्स

दरम्यान, जुईच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘ठरलं तर मग’ मालिकेत ती सध्या प्रमुख भूमिका साकारत आहे. तिच्याशिवाय या मालिकेत अमित भानुशाली, प्रिया तेंडोलकर, सागर तळाशीकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.