मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतून जुई घराघरात पोहोचली. तर सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर आता नेटकाऱ्याच्या एका कमेंटला तिने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.
जुईचा चाहतावर्ग मोठा आहे. जुईही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत ती तिच्या कामाबद्दल आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती चाहत्यांना देत असते. नुकताच तिने एक नवीन फोटोशूट केलं. त्यावर तिच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या.
जुईने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लाल रंगाची नऊवारी साडी नेसलेले काही फोटो शेअर केले. त्यापैकी एका फोटोमध्ये ती जमिनीवर बसलेली दिसत आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत विविध प्रतिक्रिया दिल्या. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “फोटो चांगला आहे. पण खाली का बसला आहात?” त्या कमेंटला जुईनेही चोख उत्तर दिलं. तिने लिहिलं, “माणसाने नेहमी जमिनीवरच राहावं.”

तर आता नेटकऱ्याच्या कमेंटला जुईने दिलेलं आहे उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तर या तिच्या कमेंटला लाईक आणि रिप्लाय देत जुईचं हे उत्तर आवडला तर सांगत तिचे चाहते तिच्या या विचारांशी सहमती दर्शवत आहेत.