मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतून जुई घराघरात पोहोचली. तर सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर आता नेटकाऱ्याच्या एका कमेंटला तिने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुईचा चाहतावर्ग मोठा आहे. जुईही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत ती तिच्या कामाबद्दल आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती चाहत्यांना देत असते. नुकताच तिने एक नवीन फोटोशूट केलं. त्यावर तिच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या.

आणखी वाचा : ‘ही’ लोकप्रिय मराठी गायिका आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची क्रश, नाव सांगत म्हणाला, “मला जशी ती आवडते तशी…”

जुईने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लाल रंगाची नऊवारी साडी नेसलेले काही फोटो शेअर केले. त्यापैकी एका फोटोमध्ये ती जमिनीवर बसलेली दिसत आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत विविध प्रतिक्रिया दिल्या. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “फोटो चांगला आहे. पण खाली का बसला आहात?” त्या कमेंटला जुईनेही चोख उत्तर दिलं. तिने लिहिलं, “माणसाने नेहमी जमिनीवरच राहावं.”

हेही वाचा : आई-वडिलांचा लग्नाला विरोध अन्..; ‘अशी’ आहे विशाखा सुभेदार यांची फिल्मी लव्हस्टोरी, म्हणाल्या, “घरी आईला कळल्यावर…”

तर आता नेटकऱ्याच्या कमेंटला जुईने दिलेलं आहे उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तर या तिच्या कमेंटला लाईक आणि रिप्लाय देत जुईचं हे उत्तर आवडला तर सांगत तिचे चाहते तिच्या या विचारांशी सहमती दर्शवत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jui gadkari replies to her fan who tries to make fun of her photo rnv