रायगड जिल्ह्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून बुधवारी मोठी दुर्घटना घडली. इर्शाळवाडीत गेल्या दोन दिवसांपासून बचावकार्य सुरु आहे. अजूनही काही स्थानिक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अभिनेत्री जुई गडकरीने सुद्धा या संदर्भात पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले होते. आता अभिनेत्रीने पुढाकार घेत येथील ग्रामस्थांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. जुईची टीम जीवनावश्यक वस्तू इर्शाळवाडीतील नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : सिंधुताईंच्या भूमिकेला आवाज देणार ‘ही’ मराठी अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझं भाग्य…”

जुईने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर ही माहिती सर्वांना दिली आहे. यामध्ये अभिनेत्री लिहिते, “इर्शाळवाडीसाठी मदत पाठवायची असल्यास कृपया मला मेसेज करा. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण इत्यादी जीवनावश्यक वस्तू इर्शाळवाडीपर्यंत माझ्या टीमकडून पोहोचवल्या जातील…”

हेही वाचा : “कौरवांनी द्रौपदीचे कपडे…”, मणिपूर घटनेवर कुशल बद्रिकेची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाला, “श्री कृष्णाची…”

जुईने काही महिन्यांपूर्वी इर्शाळगडाला भेट दिली होती. त्यावेळी अभिनेत्री तेथील स्थानिक लोकांच्या घरात जेवली होती. त्यामुळे ही दुर्घटना घडल्यावर जुईने हळहळ व्यक्त करत आता ग्रामस्थांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वीच्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने इर्शाळवाडी या उंचावर असणाऱ्या गावात वीज, मेडिकलची सुविधा नसल्याचे म्हटले होते.

हेही वाचा : “आमचं गोंडस बाळ…”, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीशी अमृता खानविलकरचं आहे खास नातं, वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट

दरम्यान, बुधवार १९ जुलैला रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी दरड कोसळली. इर्शाळवाडीतील घरांवर दरड कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. वाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने एनडीआरएफ आणि प्रशासनाला जेसीबी किंवा पोकलेन घटनास्थळापर्यंत नेणे अशक्य झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात ट्रेकर्स, एनडीआरएफ यांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jui gadkari shared a post to help the villagers of irshalwadi sva 00
Show comments