जुई गडकरी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘पुढचं पाऊल’ या गाजलेल्या मालिकेनंतर अभिनेत्री सध्या ‘ठरलं तर मग’या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत जुई गडकरीने ‘सायली’ हे प्रमुख पात्र साकारले आहे. मालिकेला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहून अलीकडेच जुईने इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसाठी प्रश्न उत्तरांचे (Ask me question) सेशन घेतले होते. या वेळी अभिनेत्रीने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतचं गाणं ऐकून श्रद्धा कपूर भारावली; मराठीत कमेंट करत म्हणाली, “किती गोड…”

Moneyedge Group financial scandal news in marathi
१०० कोटींच्या फसवणुकीबद्दल तक्रार ‘मनीएज’च्या दोन संचालकांना अटक; ‘टोरेस’नंतर आणखी एक घोटाळा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
anandwan latest news in marathi
‘आनंदवन’ला तीन कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांकडून तातडीची मदत; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
Two rickshaws collided after minor driver lost control of tempo
अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
cm devendra fadnavis
मुख्यमंत्र्यांना जोरगेवारांनी रोखले! कर्मवीर मा. सा. कन्नमवार रौप्य महोत्सवी सोहळ्यात नेमके काय घडले?

जुई गडकरीला मालिकेसंदर्भातील अनेक प्रश्न या सेशनमध्ये विचारण्यात आले होते. तसेच काही लोकांनी तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही प्रश्न विचारले. अशाच एका प्रश्नाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “मॅम, तुम्ही कधी मुंबईच्या लोकल ट्रेनमधून गर्दीच्या वेळेत कर्जत किंवा ठाणे स्थानकावरून प्रवास केला आहे का?” असा प्रश्न जुईला विचारण्यात आला.

हेही वाचा : पूजा सावंतच्या कुटुंबीयांना बिल्डिंगमधून हाकलून देण्याची मिळालेली ताकीद, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्रीनेच केला खुलासा

अभिनेत्री या प्रश्नाला उत्तर देत म्हणाली, “हो! मला ट्रेनमधून प्रवास करणे खूप सोपे जायचे. मी फक्त उभी राहायचे आणि इतर बायका मला ढकलून मस्त ट्रेनमध्ये चढवायच्या…तो अनुभव मी कधीच विसरु शकत नाही. आता मला ट्रेनची भीती वाटते.”

हेही वाचा : “प्रसूतीनंतर पापाराझींची भीती…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला अनुभव; म्हणाली, “घरी येणाऱ्या भाजीवाल्याने…”

“मुंबईत गर्दीच्या वेळेत जे लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात त्यानंतर खरंच माझा सलाम आहे.” असे उत्तर जुईने तिच्या प्रश्न-उत्तरांच्या सेशनमध्ये दिले. दरम्यान, अभिनेत्री जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या‘ठरलं तर मग’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Story img Loader