आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिने आपल्या वागण्यानेदेखील सगळ्यांची मनं जिंकली आहेत. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिच्या लोभस हास्यावर सगळेच फिदा आहेत. जुई सध्या ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) या मालिककेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि या मालिकेमधील तिची सायली ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.
ठरलं तर मग मालिकेत जुईबरोबर अभिनेता अमित भानुशाली आहे. या दोघांच्या जोडीला त्याचबरोबर मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्याचमुळे ही मालिका टीआरपीमध्येही अव्वल राहते. तसंच जुई आणि अमितही या मालिकेसाठी अविरत मेहनत घेत असतात. अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते आणि सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
सोशल मीडियाद्वारे ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधते. मालिकेचे अनेक तास चालणारे शूटिंग तसंच काही मज्जामस्तीही जुई शेअर करत असते. यावेळी अनेक चाहत्यांकडून जुईला इतक्या व्यस्त वेळापत्रकातूनही फ्रेश राहण्याबाबत विचारले जाते. याबद्दल आता स्वत: जुईने खुलासा केला आहे. जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.
जुईने सोशल मीडियावर गाणं गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “लोक मला नेहमी विचारतात की, मी नेहमीच फ्रेश कशी दिसते. धावपळीच्या वेळापत्रकात मी कशी असते. तर मी हेच (गाणं गाणे) करते! अत्यंत गजबजाटातही मी शांतता शोधण्याचा प्रयत्न करते. मी माझ्या सेटवर एक आरामदायी कोपरा शोधते आणि मला शांती देणारे जे काही आहे ते करत राहते. संगीत हे त्यापैकीच एक आहे.”
मालिकांच्या महाएपिसोड सारख्या अनेक भागांच्या शूटिंग करताना अनेकदा कलाकारांना खूप वेळ सेटवर द्यावा लागतो. मात्र हे कलाकार कोणतीही तक्रार न करता प्रेक्षकांसाठी मेहनत घेत असतात. यांचे मेहनतीबद्दल अनेक जण जुईला प्रश्न विचारत होते आणि आता जुईने चाहत्यांच्या या प्रश्नांना अखेर उत्तर दिलं आहे.
दरम्यान, जुईने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मागे सेटवरील गोंधळ ऐकू येत आहे. पण सायली मात्र अशा परिस्थितही गाणं गात एन्जॉय करत आहे. जुईच्या या गाण्याचे अनेकांनी कौतुकही केलं आहे. “तुझा आवाज खूपच छान आहे”, “जसा अभिनय, जस दिसणं तसंच अगदी गाणंही आहे”, खूपच सुंदर… तुझ्या आवाजामध्ये गोडवा आहे” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी जुईच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.