अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील जुईचं सायली हे पात्र लोकांना पसंत पडलंय. तशीच सायली आणि अर्जुनची जोडीदेखील सुपरहिट ठरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जुईने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ ‘ठरलं तर मग’साठी जुईने डेडिकेट केलाय. ‘ठरलं तर मग’ मधली सायली अर्जुनच्या प्रेमात पडते त्यावेळच्या तिच्या भावना, तिचं वागणं बोलणं सारंच बदलून जातं. याचाच खास व्हिडीओ जुईने शेअर केला आहे. मालिकेतील सायलीच्या मुमेंट्स या व्हिडीओत कॅप्चर केल्या गेल्या आहेत.
हेही वाचा… “आडनाव जोग आणि काटा काढता येत नाही” बाळासाहेब ठाकरे यांचा ‘तो’ किस्सा सांगत अनंत जोग म्हणाले…
जुईने या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिलं, “सायली अर्जुनच्या प्रेमात पडली. मी काही शॉर्ट्स पोस्ट करतेय जे मला खूप आवडलेत. हे शॉर्ट्स आमचे सहयोगी दिग्दर्शक हृषिकेश लांजेकर यांनी दिग्दर्शित आणि संपादित केले आहेत. जसं मी नेहमीच म्हणते की, मला स्व:ला स्क्रीनवर बघणं मला कधी कधीच आवडतं आणि या व्हिडीओत मला स्वत:ला बघायला खूप आवडतंय.”
जुईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. चाहत्यांनी या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “मला हा एपिसोड खूप आवडला होता. शेवटी सायलीला अर्जुनबद्दलच्या भावना समजल्या होत्या. मी फक्त त्या एका एपिसोडची वाट पाहतेय जिथे तुम्ही दोघं एकमेकांना प्रपोज कराल.” तर दुसऱ्याने लिहिलं, मला आठवतही नाही आहे की हा एपिसोड मी कितीवेळा पाहिला आहे. हा सीन सगळ्यात छान शूट झाला होता.”
‘ठरलं तर मग’ या मालिकेचा आज (१९ मे रोजी) महाएपिसोड होता. यात अर्जुनचं एक भयंकर स्वप्न दाखवलं होतं. या स्वप्नात सायली कॉन्ट्रॅक्टचं सत्य सुभेदार कुटुंबाला सांगते आणि घर सोडून निघून जाते असं अर्जुनला दिसलं होतं.
दरम्यान, जुईने याआधी ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’, ‘वर्तुळ’ अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. जुई सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकतेय. या मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीनं चाहत्यांना भुरळ घातलीय.