Tharala tar mag Fame Jui Gadkari : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुई गडकरीला ओळखलं जातं. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे जुई घराघरांत लोकप्रिय झाली. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने तिने अल्पावधीतच लाखो प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. जुई सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या व्यावसायिक कामाव्यतिरिक्त वैयक्तिक जीवनातील अनेक अपडेट्स जुई इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री दरवर्षी सामाजिक भान जपत दिवाळीचा उत्सव साजरा करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुई ( Jui Gadkari ) गेली १९ ते २० वर्षे ‘शांतिवन’ या आश्रमात जाऊन दिवाळी साजरी करते. तिथले आजी-आजोबा, कुष्ठरोगाशी झुंज देणार रुग्ण यांना अभिनेत्री मदत करते. यंदाही अभिनेत्रीने या आश्रमाला भेट देत दिवाळीचा उत्सव साजरा केला. आश्रमात गेल्यावर जुईने ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…’ हे गाणं गात उपस्थितांची मनं देखील जिंकली.

हेही वाचा : “लग्न झाल्यावर वनवास भोगायला…”, पुरस्कार जिंकल्यावर प्रसादच्या खऱ्या आयुष्यातील ‘पारू’ची खास पोस्ट! अमृता म्हणाली…

जुई गडकरीने ‘अशी’ साजरी केली दिवाळी

जुई गडकरीने ( Jui Gadkari ) शांतिवन आश्रमात जाऊन दिवाळी साजरी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालिकेच्या फॅन पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जुई प्रेमाने सर्वांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय अनेकांनी अभिनेत्रीला तिच्या डोक्यावर हात ठेवून हसतमुखाने आशीर्वाद दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी जुईवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

“जुई तू फार सुंदर काम करत आहेस…त्यांना अशीच मदत करत जा”, “आपण मोठे होण्याआधी शहाणे आणि समंजस होणं गरजेचं असतं…सुंदर जुई”, “मस्त ताई तू ग्रेट आहेस”, “जुई ताई तुझ्यामुळे मी या आजी आजोबांना फुलाची एक पाकळीची मदत करू शकले. मनापासून तुझे धन्यवाद” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा : ‘मेरे करन अर्जुन आएंगे…’, ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ब्लॉकबस्टर चित्रपट! सलमान खानने जाहीर केली तारीख…

हेही वाचा : लाडक्या सुनेचा वाढदिवस! मृणाल कुलकर्णींची शिवानी रांगोळेसाठी खास पोस्ट; म्हणाल्या, “काहीतरी गंमत…”

दरम्यान, जुई गडकरीच्या ( Jui Gadkari ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली ही महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. गेल्या पावणेदोन वर्षांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. याशिवाय जुईला सायलीच्या भूमिकेसाठी गेल्या वर्षभरात अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jui gadkari tharala tar mag actress celebrates diwali in shantivan orphanage video viral sva 00