Tharala Tar Mag Fame Jui Gadkari : छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून जुई गडकरीला घराघरांत ओळखलं जातं. सध्या अभिनेत्री सायलीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तिची ‘ठरलं तर मग’ मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत देखील पहिल्या स्थानावर आहे. अभिनेत्री मूळची कर्जतची आहे तर, मालिकेचा सेट मुंबईतील मढ परिसरात आहे. घर ते सेट असा प्रवास करताना अनेकदा जुईने रेल्वेप्रवास केल्याचं आपण पाहिलं आहे. पण, आता तिने मतदानासाठी केलेला प्रवास ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. अभिनेत्रीने नुकतीच शेअर केलेली पोस्ट सर्वत्र चर्चेत आली आहे.
जुईने ( Jui Gadkari ) मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी धावपळीत मढ ते कर्जत असा प्रवास केला आहे. सेटपासून आपलं घर दूर असलं तरीही वेळात वेळ काढून जुई गडकरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कर्जतला पोहोचली आहे. याची पोस्ट अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हेही वाचा : न्यूझीलंड टू पुणे; ३२ ते ३६ तासांचा प्रवास केल्यानंतर गिरीजा ओकने बजावला मतदानाचा हक्क, म्हणाली, “मी ज्या विभागात राहते… “
जुईने सर्वात आधी मुंबई ते कर्जत…असा प्रवास करत सुरुवातीला आपलं घर गाठलं. त्यानंतर अभिनेत्रीने परतीचा प्रवास कर्जत ते मढ आयलंड असा करत पुन्हा एकदा सेटवर येऊन कामावर सुरुवात केली आहे. यादरम्यान जुईने ट्रेन, मेट्रो, रिक्षा, जेट्टी बोट असा प्रवास करत मढ किनारपट्टी गाठली. त्यानंतर पुढे रिक्षाने प्रवास करत जुई मालिकेच्या सेटवर पोहोचली आहे.
जुईने गडकरीने ( Jui Gadkari ) या पोस्टच्या कॅप्शनमध्ये शेवटी लिहिलंय की, “मतदान नक्की करा! होय, तुमच्या एका मताने नक्कीच फरक पडतो…” अभिनेत्रीने एवढ्या दूरवरचा प्रवास करून आपला मतदानाचा हक्क बजावल्याने सध्या सर्वत्र तिचं कौतुक करण्यात येत आहे.
हेही वाचा : शाहरुख खान दोन्ही मुलांसह नव्या चित्रपटासाठी येणार एकत्र, ट्रेलर आला समोर; म्हणाला, “आर्यन आणि अबरामबरोबर…”
े
हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ मालिका का लांबवली? रुपाली भोसलेने सांगितलं यामागचं सत्य, म्हणाली, “आमचा विचार न करता…’
दरम्यान, एका नेटकऱ्याने जुईच्या ( Jui Gadkari ) पोस्टवर कमेंट करत “जबाबदार नागरिक…जुई ताई एवढ्या व्यग्र शेड्यूलमधून तू मतदान करण्यासाठी आलीस. आज शूटला सुट्टी नव्हती का?” असा प्रश्न तिला विचारला आहे. तर, तिच्या अन्य चाहत्यांनी, “एक मत कर्जतच्या भविष्यासाठी”, “सायलीचं Reel आणि Real आयुष्य एकदम बॅलन्स आहे”, “शाब्बास ताई” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या पोस्टवर दिल्या आहेत.