Jui Gadkari Education : ‘ठरलं तर मग’ मालिकेतल्या साध्या, सोज्वळ सायलीने गेल्या दोन वर्षांत प्रत्येकाचं मन जिंकून घेतलं आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ही भूमिका अभिनेत्री जुई गडकरी साकारत आहे. सध्या ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा अग्रस्थानी आहे त्यामुळे छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून तिला घराघरांत ओळखलं जातं. मालिकाविश्व गाजवणाऱ्या या गुणी अभिनेत्रीचं शिक्षण किती आहे हे तुम्हाला माहितीये का? नुकत्याच घेतलेल्या ‘आस्क मी सेशन’मध्ये अभिनेत्रीने याचा उलगडा केला आहे.

जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट्स, शूटिंगच्या सेटवरची धमाल, ‘ठरलं तर मग’ मालिकेचे प्रोमो ती नेहमी शेअर करते. याशिवाय जुई अनेकदा इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेऊन चाहत्यांशी जोडून राहण्याचा प्रयत्न करते. नुकत्याच घेतलेल्या सेशनमध्ये अभिनेत्रीला तिच्या एका चाहत्याने शैक्षणितक पार्श्वभूमीबद्दल प्रश्न विचारला. याला उत्तर देताना जुईने तिने कोणत्या विषयात पदवी संपादन केलीये ( Jui Gadkari Education ) याचा खुलासा केला आहे.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
Shailendra kumar bandhe Success Story
Success Story: शिपायाची नोकरी ते अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास

हेही वाचा : “सासू-सून महायुती…”, नवीन लग्न झालेल्या पृथ्वीक प्रतापला घासावी लागली भांडी! मजेशीर व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

जुई गडकरीचं शिक्षण

जुई गडकरीने ( Jui Gadkari ) आपलं पदवीपर्यंतच शिक्षण BMM मध्ये पूर्ण केलं आहे. Advertising विषयात पदवी संपादन करत जुईने मुंबई विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळवलं आहे. यानंतर जुईने पदव्युत्तर पदवी Advertising And PR या विषयात संपादन केली आहे. याशिवाय अभिनेत्रीने तिचं MBA मार्केटिंगमध्ये पूर्ण केलंय. याला जोडून जुईने तिचा डिप्लोमा डिजिटल मार्केटिंग विषयात पूर्ण केला आहे. आता अनेकांना प्रश्न पडेल एवढी उच्चशिक्षित जुई अभिनयाकडे कशी वळली? याबद्दल जाणून घेऊयात…

शिक्षण पूर्ण करत असताना आपण भविष्यात अभिनय क्षेत्रात येऊ असा जुईने कधीच विचार केला नव्हता. मात्र, लहानपणापासूनच तिला गाण्याची आवड होती. जुईच्या एका मैत्रिणीला कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये मालिकेच्या ऑडिशनसाठी जायचं होतं. यावेळी जुई तिच्याबरोबर केवळ स्टुडिओ पाहण्यासाठी गेली होती. तिच्या मैत्रिणीचं सिलेक्शन काही झालं नाही. पण, तिथल्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी जुईला ऑडिशन देण्यासाठी भाग पाडलं अन् तिची ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेसाठी निवड झाली. यामध्ये जुईने ‘चंदा’ ही सहायक भूमिका साकारली होती आणि इथूनच तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली.

हेही वाचा : “महाराष्ट्र हरलास तू…”, विधानसभेच्या निकालानंतर तेजस्विनी पंडितची पोस्ट; म्हणाली, “राजसाहेब…”

Jui Gadkari Education
जुई गडकरीचं शिक्षण किती आहे ? ( Jui Gadkari Education )

‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’नंतर काही मालिकांमध्ये जुईने सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं. मात्र, त्यानंतर २०११ मध्ये आलेली ‘पुढचं पाऊल’ मालिका जुईसाठी गेमचेंजर ठरली. यामध्ये तिने साकारलेल्या ‘कल्याणी’ या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या मालिकेने जवळपास ७ ते ८ वर्ष छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं.

Story img Loader