‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’. या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता माळीने साकारलेली मेघना आणि अभिनेता ललित प्रभाकरने साकारलेला आदित्य देसाई ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. तसंच मालिकेतील इतर पात्र देखील गाजली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बाबाजी, बाबाजी करणारे मेघनाचे बाबा म्हणजेच अभिनेते उदय टिकेकर यांनी साकारलेलं पात्र अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहे. विशेष म्हणजे अजून या मालिकेचं शीर्षकगीत प्रेक्षक आवडीने ऐकतात. अनेकांच्या मोबाइलच रिंगटोन ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेचं शीर्षकगीत आहे. अशा या लोकप्रिय मालिकेला ११ वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. प्राजक्ताने ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील काही फोटो शेअर केले आहेत.
हेही वाचा – “परमेश्वरा मी थकतोय…”, पुष्कर जोगच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाला, “खूप फसवतात…”
प्राजक्ता माळीची पोस्ट वाचा…
१- फिरूनी नवी जन्मेन मी – मी मराठी
२- सुवासिनी – स्टार प्रवाह
३- नकटीच्या लग्नाला यायचं हं! – झी मराठी
४- सुगरण – साम मराठी (निवेदन)
५- गाणे तुमचे आमचे – ई टिव्ही मराठी – (निवेदन)
६- गुडमोर्निंग महाराष्ट्र – झी मराठी – (निवेदन)
७- मस्त महाराष्ट्र – – Living foods आणि झी मराठी (travel anchor)
८- महाराष्ट्राची हास्यजत्रा – सोनी मराठीगेली १३ वर्ष कला मनोरंजन क्षेत्रात काम करतेय. या वर्षांमध्ये टिव्ही जगतात वरील प्रोजेक्ट्स केले. पण ‘जुळून येती रेशीमगाठी’वर प्रेक्षकांचं असणारं प्रेम काही औरच आहे.
काल या मालिकेला सुरू होऊन ११ वर्ष झाली. ११ वर्षात इतर अनेक चित्रपट- मालिका येऊनही रेशीमगाठी कधी झाकोळली गेली नाही. आजही लोक मालिकेचं नाव घेऊन कौतूक करतात. प्रेमाचा वर्षाव चालूच आहे. हेच या मालिकेचं खरं यश. हीच प्रेक्षकांची आणि आमची #रेशीमगाठ. ही मालिका माझ्या पदरात पडली याकरता देवाचे मानू तेवढे आभार कमीच.
हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस’ने घेतली मैत्रीची परीक्षा; करणवीर मेहरा, विवियनसह ‘हे’ सात सदस्य झाले नॉमिनेट
हेही वाचा – Video: “तुम्ही बेअक्कल लोक आहात…”, मुंबईच्या ट्रॅफिकमधील ‘ती’ कृती पाहून गौतमी देशपांडे भडकली, म्हणाली…
प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. एका चाहतीने लिहिलं आहे, “११ वर्षांपासून माझ्या मोबाइला डीपी तोच आहे.” यावर प्राजक्ता म्हणाली की, ११ वर्ष माझ्या आईची रिंगटोन रेशीमगाठीचीच होती. आता बदलून ‘फुलवंती’ झालीये. याशिवाय अनेक चाहत्यांनी अजूनही ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिका बघत असल्याचं सांगितलं.