मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अमृता बने-शुभंकर एकबोटे, पूजा सावंत-सिद्धेश चव्हाण, तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके, प्रथमेश परब-क्षितिजा घोसाळकर असे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. आता यामध्ये छोट्या पडद्यावरील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याचं नाव जोडलं जाणार आहे.

छोट्या पडद्यावरच्या मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. या मालिकांमध्ये काम करणारे कलाकार सुद्धा प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. अशाच एका अभिनेत्याचा लग्नसोहळा नुकताच पार पडला आहे. ‘कन्यादान’, ‘वैजू नंबर १’ या प्रसिद्ध मालिकांमधून अभिनेता चेतन गुरव घराघरांत लोकप्रिय झाला. सध्या तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. चेतन नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नातील खास फोटो अभिनेत्री अमृता बनेने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : प्राजक्ता माळीचं ‘नाच गं घुमा’ चित्रपटाशी आहे खास कनेक्शन! पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाली, “माझी पहिली पार्टनरशिप…”

गेल्या महिन्यात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा उरकत चेतनने नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. साखरपुड्याप्रमाणे अभिनेत्याच्या लग्नाला देखील मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित राहिले होते. याशिवाय अभिनेता पृथ्वीक प्रतापने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चेतनच्या हळदीची खास झलक शेअर केली होती. त्याच्या हळदीला सुद्धा बरेच कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा : Video : गौरव मोरेने घेतली अलका कुबल व भरत जाधव यांची भेट! पाहताक्षणी दोघांच्या पाया पडला अन्…, सर्वत्र होतंय कौतुक

चेतनची पत्नी पायलने लग्नात पिवळ्या रंगाची नऊवारी साडी त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज, भरजरी दागिने, हिरवा चुडा असा मराठमोळा लूक केला होता. तर, चेतनने पांढऱ्या रंगाच्या सदऱ्यावर मजंठा रंगाचा छानसा असा शेला घेतला होता. हे नववधू या लूकमध्ये फारच सुंदर दिसत होते. अमृता बनेने त्यांच्या वरमाला विधीचा खास फोटो शेअर करत यावर “नांदा सौख्यभरे…” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच या फोटोंमध्ये तिने चेतनसह त्याच्या बायकोला टॅग केलं आहे.

chetan gurav
‘कन्यादान’ फेम अभिनेत्याचं लग्न

हेही वाचा : प्रसाद ओकच्या बायकोचा वाढदिवस! अमृता खानविलकरची मंजिरीसाठी खास पोस्ट, ‘असं’ केलं सेलिब्रेशन

दरम्यान, चेतनच्या लग्नाला मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. कलाविश्वातील अनेक कलाकारांनी अभिनेत्याच्या लग्नाला खास उपस्थिती लावत त्याला पुढील आयुष्यासाठी शुभाशीर्वाद दिले. सध्या मराठी मनोरंजनविश्वातून चेतनवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Story img Loader