Kanyadaan Fame Marathi Actor Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शाल्व-श्रेया, निखिल राजेशिर्के, रेश्मा शिंदे, कौमुदी वलोकर, किरण गायकवाड या कलाकारांच्या पाठोपाठ आता ‘कन्यादान’ मालिकेत झळकलेला लोकप्रिय अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. अभिनेत्याचे लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गेल्या महिन्याभरात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधत वैयक्तिक आयुष्यात एका नव्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे. ‘कन्यादान’ मालिकेत झळकलेला अभिनेता देवेश काळे बोहल्यावर चढला आहे. देवेशने काही दिवसांपूर्वीच पत्नीसह समुद्रकिनारी रोमँटिक फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. आता देवेश आणि सारिका लग्नबंधनात अडकले आहेत.
देवेशने त्याची लग्नपत्रिका स्वत: डिझाइन केली होती. “आमची लग्नपत्रिका अशी झाली तयार, तुमच्यासाठी खास, प्रेमाने सजवलेली!” असं कॅप्शन देत लग्नपत्रिकेचा व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. देवेश आणि सारिका या दोघांच्या नावांचं मिश्रण करुन लग्नात या जोडप्याने ‘सारा का सारा देवेश’ हा हॅशटॅग वापरला होता.
देवेश काळेची पत्नी सारिका भणगे ही प्रसिद्ध सेलिब्रिटी छाया चित्रकार आहे. लग्नसोहळ्यात या जोडप्याने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. कलाविश्वातील बऱ्याच सेलिब्रिटींनी देवेश आणि सारिकाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. सध्या संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
दरम्यान, देवेश काळेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘कन्यादान’ या मालिकेसह देवेश ‘पुष्पक विमान’ आणि ‘बांबू’ या चित्रपटांच्या टीमसह देखील जोडला गेला होता. अभिनेत्याने भटकंतीची सुद्धा प्रचंड आवड असल्याचं त्याचं इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहून लक्षात येतं. आता देवेश आणि सारिका लग्नबंधनात केव्हा अडकणार हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते आतुर आहेत.