टीव्ही असो वा सिनेसृष्टी, स्टार्सच्या संपत्तीबद्दलची चर्चा नेहमीच रंगते. सिनेसृष्टीत शाहरुख खान सर्वांत श्रीमंत व देखणा अभिनेता मानला जातो. मात्र, टीव्ही इंडस्ट्रीसंदर्भात बोलायचं झालं, तर ‘अनुपमा’फेम रूपाली गांगुली आणि ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’फेम दिलीप जोशी ऊर्फ जेठालाल यांची नेहमीच चर्चा होते. या दोघांनाही मोठ्या कमाईसाठी ओळखलं जातं. पण, नव्या आकडेवारीनुसार, टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत श्रीमंत कलाकारांच्या यादीत कपिल शर्मा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यानं इतर टीव्ही कलाकारांनाही मागे टाकलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलं. कॉमेडियन कपिल शर्मा हा टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत श्रीमंत कलाकार ठरला आहे. ’मनी कंट्रोल’च्या अहवालानुसार, कपिल शर्मा आपल्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी मोठी रक्कम घेतो. या अहवालात सांगितलं आहे की, कपिल त्याच्या कॉमेडी ओटीटी शोसाठी एका एपिसोडसाठी तब्बल पाच कोटी रुपये घेतो. डीएनए, फर्स्टपोस्ट आणि इतर ऑनलाइन पोर्टल्सच्या मते, कपिल शर्माची एकूण संपत्ती ३०० कोटी रुपयांपर्यंत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत श्रीमंत कलाकारांच्या यादीत कपिल आता टॉपवर आहे.

हेही वाचा…Bigg Boss संपलं पण, मैत्री कायम! सूरजला खांद्यावर उचललं, ‘झापुक झुपूक’ डान्स अन्…; वैभवची ‘गुलीगत किंग’साठी खास पोस्ट

टीव्हीच्या टॉप स्टार्सच्या नेटवर्थबाबत बोलायचं झालं, तर एबीपी न्यूजच्या अहवालानुसार, ‘अनुपमा’फेम रूपाली गांगुली यांची एकूण संपत्ती २०-२५ कोटी रुपये असून, दिलीप जोशी ऊर्फ जेठालाल यांची संपत्ती सुमारे ४७ कोटी रुपयांच्या आसपास आहे.

कपिल शर्माचे आलिशान घर आणि लक्झरी गाड्या

कपिल शर्माच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं, तर मुंबईतील अंधेरी भागात त्याचा एक आलिशान बंगला आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्याही आहेत. ‘हाउसिंग डॉट कॉम’ व ‘मॅजिक ब्रिक्स’च्या अहवालानुसार, त्याच्या अंधेरीतल्या बंगल्याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे. त्याच्या लक्झरी गाड्यांच्या कलेक्शनमध्ये वोल्व्हो XC90, मर्सिडीज-बेंझ S350, रेंज रोव्हर इवोक व एक उच्च दर्जाची डिझाइन केलेली व्हॅनिटी व्हॅन आहे. एकूण पाच कोटींच्या लक्झरी गाड्यांचा तो मालक असल्याचं सांगितलं जातं.

हेही वाचा…Video: शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMCची तात्काळ कारवाई, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने मानले आभार, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

सिनेमातही आजमावलं नशीब

कपिल शर्माच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं टीव्हीशिवाय चित्रपटसृष्टीतही नशीब आजमावलं आहे. २०१५ साली ‘किस किसको प्यार करूं’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं; परंतु, त्याचा पहिला चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. त्यानंतर त्यानं २०१७ मध्ये ‘फिरंगी’, २०२३ मध्ये ‘ज्विगाटो’ व २०२४ मध्ये ‘क्रू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘क्रू’ चित्रपटात त्याची भूमिका फार मोठी नसली तरी त्याचं काम चाहत्यांना आवडलं होतं.

हेही वाचा…“मी स्पष्टीकरण देण्यासाठी जन्मलेले नाही”, निक्की तांबोळीचे वर्षा उसगांवकरांबद्दल स्पष्ट वक्तव्य; म्हणाली, “त्यांचे पाय धरून…”

कपिल शर्मा हे केवळ टीव्हीवरच नव्हे, तर संपूर्ण मनोरंजन विश्वात एक मोठं नाव बनलं आहे आणि कलेच्या जोरावर त्यानं स्वत:ची यशस्वी कारकीर्द घडवली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma becomes the richest tv star surpassing all in wealth psg