कॉमेडीयन कपिल शर्मा त्याच्या उत्तम कॉमेडीसाठी केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. त्याच्या कॉमेडीचे असंख्य चाहते आहेत. आपल्या शोच्या माध्यमातून कपिल केवळ प्रेक्षकांनाच नाही तर मोठ मोठ्या सेलिब्रेटींनाही हसवण्यात यशस्वी ठरला आहे. पण अलिकडेच एका पार्टीमध्ये कपिल शर्माचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. कपिलने पत्नी गिन्नी चतरथसह एका दिवाळी पार्टीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने सर्वांसमोर असं काही केलं की त्याची पत्नीही अवाक झाली.

कपिल शर्मा त्याची पत्नी गिन्नी चतरथसह कृष्ण कुमार यांच्या दिवाळी पार्टीमध्ये पोहोचला होता. त्यावेळी त्याने फोटोग्राफर्सना पोज दिली. काही फोटो क्लिक केल्यानंतर कपिल अचानक गिन्नीच्या बाजूने झुकला आणि तिच्या गालावर किस केलं. कपिलचं असं अचानक वागणं पाहून गिन्नीही काही वेळ गोंधळली. पण नंतर तिने हसत हसत वेळ सांभाळून घेतली. पण जेव्हा फोटोग्राफर्सनी ओरडून कपिलला चिअरअप केलं तेव्हा मात्र तो स्वतःही काहीसा लाजला.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच

आणखी वाचा-“चित्रपट न चालल्यास फारसा फरक पडणार नाही, कारण…”; ‘ज्विगाटो’ चित्रपटाबद्दल कपिल शर्माची प्रतिक्रिया चर्चेत

दिवळी पार्टीच्या वेळी कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ क्रीम कलरच्या आउटफिट्समध्ये दिसले. कपिलने क्रीम कलरचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. तर गिन्नी क्रीम कलरचा सिल्क सूट आणि मल्टी कलर ओढणीमध्ये दिसली. कपिल शर्माच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा- “चेहऱ्याची सर्जरी केलीस का?” दिवाळी पार्टीत अजय देवगणच्या मुलीला पाहून नेटकऱ्यांचा सवाल

दरम्यान कपिल शर्माने गिन्नी चतरथशी १२ डिसेंबर २०१८ मध्ये जालंधर येथे लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर डिसेंबर २०१९मध्ये त्यांची मुलगी अनायरा जन्म झाला तर फेब्रुवारी २०२१ मध्ये ते दोघं पुन्हा आई-बाबा झाला. गिन्नीने मुलगा त्रिशानला जन्म दिला. कपिल शर्माच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच ‘ज्विगाटो’ या चित्रपटात दिसणार आहे. नंदिता दासचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट एका मॅनेजरच्या जीवनावर आधारित आहे जो करोना काळात आपली नोकरी गमावतो. त्यानंतर तो एका फूड डिलीव्हरी कंपनीत काम सुरू करतो. या चित्रपटात कपिलने अप्रतिम काम केलं आहे.

Story img Loader