कॉमेडियन कपिल शर्माने अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या कपिलचा द कपिल शर्मा शोही लोकप्रिय आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये अनेकदा हजेरी लावतात. बॉलिवूडसह क्रिकेट व इतर सेलिब्रिटीही कपिल शर्मा शोमध्ये सहभागी होतात.
शोमध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची कपिल त्याच्या विनोदी स्टाइलने फिरकी घेताना दिसतो. नुकतंच कपिलने आजतकला मुलाखत दिली. ‘सीधी बात’ या विशेष कार्यक्रमात कपिलने हजेरी लावली. या मुलाखतीत कपिलने करिअर, वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. रेड कार्पेटवरील सिताऱ्यांसह अनेक सेलिब्रिटींनी आजवर कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत “पंतप्रधान नरेंद्र मोदी द कपिल शर्मा शोमध्ये येणार का?”, असा प्रश्न कपिलला विचारण्यात आला.
हेही वाचा>> Video: स्टेजवर गात होता एमसी स्टॅन, गर्दीतून कुणीतरी बाटली फेकली अन्…; कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा>> ३२व्या वर्षी मालिकाविश्वातील अभिनेत्रीने केले Eggs Freeze, म्हणाली “भविष्यात लग्न…”
कपिलने मुलाखतीतील या प्रश्नाचं उत्तर देताना पंतप्रधान मोदींना कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी आमंत्रित केल्याचा खुलासा केला. कपिल म्हणाला, ” मी जेव्हा पंतप्रधान मोदींना भेटलो होतो, तेव्हा त्यांना कपिल शर्मा शोमध्ये येण्याची विनंती केली होती. मोदींनी माझ्या शोमध्ये येण्यास नकार दर्शविला नाही. सध्या तरी विरोधकांकडून माझ्याबाबत खूप विनोदी गोष्टी बोलल्या जात आहेत. कधीतरी तुझ्या शोमध्ये येऊ, असं मोदी म्हणाले होते”.
हेही वाचा>> “उर्फी जावेद भाजपात गेली काय?” भास्कर जाधवांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले “तिच्या कपड्यांबाबत…”
कपिल ‘ज्विगाटो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट १७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत असून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या तो व्यग्र आहे.