‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘वागळे की दुनिया’ अशा कॉमेडी शोमध्ये नाना पाटेकर यांची नक्कल करणारा अभिनेता तीर्थानंद राव याने फेसबुक लाइव्हदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या मित्रांनी फेसबुक लाइव्ह पाहिल्यानंतर जवळच्या पोलीस स्थानकात फोन केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तीर्थानंदच्या प्रकृतीबद्दल माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – कपिल शर्माच्या शोमधील अभिनेत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुक लाइव्हदरम्यान उचललं धक्कादायक पाऊल, कारण…
तीर्थानंदने ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना आत्महत्येसारखं पाऊल उचलण्यामागचं कारण सांगितलं. तसेच त्याच्या प्रकृतीविषयीही माहिती दिली. लिव्ह-इन पार्टनरसोबत रिलेशनशिपच्या मुद्द्यांवरून वाद झाला आणि त्याने हे कठोर पाऊल उचलले. “मी माझ्या जोडीदाराबरोबर मीरा रोड इथं राहतो, तिच्याबरोबर वाद झाल्यानंतर मी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर मला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण आता मी घरी आहे आणि मी ठीक आहे,” असं तीर्थानंद म्हणाला.
“आता फक्त आठवणीतच…”, शशांक केतकरचा वडिलोपार्जित वाडा पाडला जाणार; म्हणाला, “एका घराऐवजी…”
दरम्यान, तीर्थानंदला आता नियमितपणे काम मिळत आहे. त्याने अभिषेक बच्चन सोबत दाक्षिणात्य चित्रपटाच्या रीमेकसाठी शूट देखील केलं आहे. “मला कपिल शर्मा शोमध्ये ज्युनियर नाना पाटेकर म्हणून बोलावण्यात आले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मी वागळे की दुनियाचे बारा ते चौदा भाग शूट केले, ज्यात मी जोशी काकांची भूमिका साकारली. जानेवारीमध्ये मी अभिषेक बच्चनसोबत एक चित्रपटही केला आहे. मार्चमध्ये मी एका अवॉर्ड फंक्शनसाठीही परफॉर्म केले होते,” असं तीर्थानंदने सांगितलं.
हेही वाचा – Video: “गमावलं ना मी तुला”! मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात, कारचा झाला चेंदामेंदा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
तीर्थानंदने करोना काळात लॉकडाऊन दरम्यानही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याबद्दल विचारले असता तो म्हणाला, “त्यावेळी माझ्याकडे काम नसल्यामुळे मी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होतो. परिणामी मी आत्महत्येसारखं कठोर पाऊल उचललं होतं.”