अभिनेता करण हुक्कू अडचणीत सापडला आहे. इटालियन ब्रँडची घड्याळ सांगत खोटी घड्याळ चित्रपट निर्मात्याला विकून त्याने लाखो रुपये कमावल्याचा आरोप आहे. यानंतर निर्मात्याने करणविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. तक्रारकर्ता हा चित्रपट निर्माता व कपड्यांचा व्यावसायिक आहे.

पाच वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपं होणार आई-बाबा; समुद्रकिनारी केलेलं फोटोशूट चर्चेत

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, ४८ वर्षीय मोहम्मद सलीम फारुकी यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, अभिनेत्याने त्यांना पनेराई कंपनीच्या घड्याळांचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले आणि त्याने हे घड्याळ थेट कंपनीतून घेतल्याचा दावा केला. घड्याळ आवडल्यानंतर त्याची किंमत ७ लाख रुपये आहे, असं करणने सांगितलं. त्यानंतर फारुकी यांनी हुक्कूकडून घड्याळ खरेदी केले. घड्याळात काही डिफेक्ट असल्यास तो जबाबदार असेल असे वचन करण दिले.

विमानतळावर तुम्ही मुद्दाम सेलिब्रिटींची जास्त तपासणी करता? समीर वानखेडे म्हणाले, “ज्यांना तुम्ही सेलिब्रिटी वगैरे म्हणता…”

घड्याळ खरेदी केल्यावर फारुकी यांनी एका तज्ज्ञाला घड्याळ दाखवले. त्याने सांगितलं की ते त्याच नावाचे बनावट घड्याळ आहे आणि त्याची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. फारुकी यांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, बनावट घड्याळ असल्याचं मी करणला सांगितल्यानंतर त्याने पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. पण नंतर मात्र पैसे न देताच त्याने माझा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर फारुकी यांनी पोलिसांत तक्रार दिली.

करण हुक्कूने ‘क्या लव्ह स्टोरी है’ (२००७) आणि ‘ट्रिक’ तसेच ‘सजदा तेरे प्यार में’, ‘तेरा मुझे है पहले का नाता कोई’, आणि ‘घर की लक्ष्मी बेटियां’सह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.