करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशने ‘बिग बॉस-१५’ मध्ये सहभाग घेतला होता. बिग बॉसमध्ये असताना त्यांचं नातं घट्ट झालं आणि ते एकमेकांना डेट करू लागले. त्यांच्याबद्दल अनेक अफवाही पसरल्या होत्या. त्यांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. याबद्दल करणने एका मुलाखतीत आपलं मत व्यक्त केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लव्ह अधुरा’ शोच्या प्रमोशन्सदरम्यान करणने त्याच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल सांगितलं की, त्याची सहकलाकार एरिका फर्नांडिस म्हणाली होती की, करण कदाचित कधीच लग्न करणार नाही.

हेही वाचा… प्रियांका चोप्राचा भाऊ लवकरच अडकणार लग्नबंधनात; रोका विधी पार पाडत शेअर केली गुड न्यूज

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत करणने त्याच्या आणि तेजस्वी प्रकाशच्या नात्याबद्दल भाष्य केलं. एका जुन्या मुलाखतीत एरिका फर्नांडिस आणि करण कुंद्राला एकमेकांसाठी मॅट्रीमोनी प्रोफाईल तयार करायला सांगितलं, तेव्हा एरिका थट्टा करत म्हणाली, “करण कधीही लग्न करणार नाही.” याला उत्तर देत करण म्हणाला, “ही वेळ बदण्यासाठी उशीर लागणार नाही.” माझ्या मुलाखती शोच्या ट्रेलरसारख्या दिशाभूल करणाऱ्या असतात.

करण कुंद्राने त्याच्या आणि तेजस्वी प्रकाशच्या नात्याबद्दल तसेच त्यांच्या ब्रेकअप व लग्नाच्या अफवांचा परिणाम त्याच्यावर कसा होतो, याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, “या सगळ्या गोष्टींचा मला फरक पडत नाही. कारण आम्ही आमचं आयुष्य एकत्र जगतोय. काही जण म्हणतात आमचं ब्रेकअप झालंय, तेजस्वीने दुसऱ्या मुलाबरोबर लग्न केलंय. ते खूपच फुकट बसलेले असतात, म्हणून अशाप्रकारचं विधान करतात.”

हेही वाचा… अदा शर्माने नेसली चक्क १५ रुपयांची साडी; अभिनेत्री म्हणाली, “याची किंमत…”

दरम्यान, करणचा शो ‘लव्ह अधुरा’ ॲमेझॉन मिनी टीव्हीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात करणबरोबर एरिका फर्नांडिस प्रमुख भूमिका साकारत आहे. यादरम्यान, करण आणि एरिकाला प्रेमाच्या व्याख्येबद्दल विचारलं असता, एरिका म्हणाली, आम्हाला प्रेम या शब्दाची व्याख्या माहीत नाही; कारण प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. प्रेम वेगवेगळ्या स्वरूपात असतं. जेवढं तुम्ही प्रेमाच्या मागे धावाल तेवढं तुमच्यापासून प्रेम दूर जाईल.” करण यालाच जोडून म्हणाला, “आपल्याला प्रेमाला व्याख्या देणं थांबवायला हवं, आपल्याला प्रेम शोधणं थांबवायलं हवं, ते आपोआप होऊ द्यावं, नाही तर खूप दबाव आल्यासारखं वाटेल.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan kundra on marriage with tejaswi prakash rumours and trolls dvr