करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. करण व तेजस्वी गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे. करण व तेजस्वी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. करणने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्याने या चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करणने नुकतंच ‘रेडियो सिटी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने तेजस्वी प्रकाशबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. करण म्हणाला, “बिग बॉसनंतर तेजस्वीचे कुटुंबीयही लग्नासाठी तयार आहेत.पण सध्या आम्ही दोघंही कामात व्यग्र आहोत. तेजस्वीची ‘नागिण ६’ ही मालिका संपतच नाहीये. मी तर मार्च महिन्यातही लग्न करण्यासाठी तयार आहे”. लग्न कुठे करणार याबाबत विचारताच करण म्हणाला, “मी तर कुठेही लग्न करायला तयार आहे. फिल्म सिटी, सेटवर कुठेही लग्न केलेलं मला चालेल”.

हेही वाचा>> ‘पठाण’च्या निर्मात्यांकडून चाहत्यांना मोठं गिफ्ट! चित्रपटाचं तिकिट ११० रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या

तेजस्वी प्रकाशबरोबर लग्नाच्या बेडीत अडकण्याबाबतही करणने भाष्य केलं. “लग्नाचा विषय निघाल्यावर मला थोडं टेन्शन येत. पण आम्हाला एकत्र पाहायला चाहत्यांना आवडतं. प्रेक्षकांना आम्हाला एकत्र पाहायचं आहे. आमच्यातील प्रेम व रिलेशनशिप एक स्टेप पुढे गेलेलं लोकांना पाहायचं आहे. ही सुखावणारी भावना आहे”, असंही करण म्हणाला.

हेही वाचा>> Video: आदिल खानच्या अटकेनंतर गर्लफ्रेंड तनु चंडेल पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, राखी सावंतबाबत विचारताच म्हणाली…

करण इश्क मे घायल मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर तेजस्वी नागिण ६ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस १५’ मध्ये सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात त्यांच्यातील जवळीक वाढली. त्यानंतर ते आता रिलेशनशिपमध्ये आहेत. तेसस्वी प्रकाश या पर्वाची विजेती ठरली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan kundra talk about wedding plan with actress tejaswi prakash kak