छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेता करण कुंद्राचं नाव टॉपला आहे. करणचा आज ३८वा वाढदिवस आहे. ‘कितनी मोहब्बत है’, ‘तेरी मेरी लव स्टोरी’, ‘ये कहाँ आ गए हम’, ‘एमटीव्ही लव स्कूल’, ‘दिल ही तो है’, ‘गुमराह’ सारख्या अनेक नावाजलेल्या मालिकांमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली. कामाबरोबरचं करणचं खासगी आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिलं. एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्याने आपल्या सह अभिनेत्रीच्या कानाखाली मारली. सेटवर घडलेली ही घटना तेव्हा बरीच चर्चेत होती.

नेमकं काय घडलं?
‘ये कहाँ आ गए हम’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान करणचा राग अनावर झाला होता. या मालिकेमध्ये अभिनेत्री सान्वी तलवार करणबरोबर काम करत होती. या दोघांचा एक इंटिमेट सीन होता. या सीनदरम्यान सान्वीला करणच्या कानाखालीही मारायची होती. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, सान्वीने करणच्या जोरातच कानाखाली मारली.

सान्वीने करणला कानाखाली मारताच त्याचा राग अनावर झाला. करण त्याच्या रागावर नियंत्रण मिळवू शकला नाही. सीन चित्रीत झाल्यानंतर तो सान्वीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये पोहोचला. तिथे त्याने सगळ्यांसमोर तिच्या कानाखाली मारली. अपशब्द वापरले असं बोललं जातं. या प्रकरणानंतर सान्वीला मोठा धक्का बसला होता.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 4 : “अरे ए किरण माने तुला…” अपूर्वा नेमळेकरची दादागिरी सुरुच, राग अनावर झाला अन्…

या प्रकरणानंतर सान्वीने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, “महिलांना अशी वागणूक मिळणं मला योग्य वाटत नाही. करण अपशब्द वापरत असताना किंवा मला कानाखाली मारत असताना त्याला कोणीच थांबवलं नाही किंवा रोखलं नाही याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं. याउलट लोकांनी मलाच शांत केलं.” करण-सान्वीचं हे प्रकरण तेव्हा प्रचंड गाजलं होतं.

Story img Loader