छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि बिनधास्त अभिनेता म्हणून करण पटेल ओळखला जातो. ‘ये हे मोहोब्बते’ मालिकेच्या माध्यमातून करण घराघऱात पोहचला. सोशल मीडियावर करण नेहमी सक्रिय असतो. व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून तो चाहत्यांना अपडेट देत असतो. करिअरबरोबरच करण त्याच्या व्यक्तिक आयुष्यामुळेही जास्त चर्चेत राहिला आहे. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत करण कुंद्राने त्याच्या वाईट काळातील घटनांबाबत अनेक खुलासे केले आहेत.
करण म्हणाला, “खरे सांगायचे तर, स्टार बनण्याच्या माझ्या इच्छेमध्ये मी काहीही गमावले नाही. जर तुम्हाला स्टार व्हायचे असेल तर तुम्ही अनेक गोष्टींशी जोडले जाऊ शकत नाही. म्हणजे, तुम्हाला हरण्याची आणि पुढे जाण्याची इच्छा असणे आवश्यक आहे.” आयुष्यातील चुकांबद्दल बोलताना म्हणाला, आयुष्यातील प्रत्येक वळणावर मी चूक केली. या चूकीतून मी शिकतही गेलो. पण काही ठिकाणी चांगल वागूनही वाईट वागणूक मिळाली. त्यातूनही मी चांगला धडा शिकला. . माझ्याकडून अनेक चुका झाल्या आहेत पण मी त्यातूनही काहीना काहीतर शिकलो. त्यामुळे मी त्याच त्या चूका पुन्हा करत नाही.
करिअरमधील ब्रेकबद्दल बोलताना करण म्हणाला, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता. कस्तुरी मालिका एका कारणास्तव बंद होती आणि त्यामागचे कारण मी होतो. बऱ्याच लोकांना हे माहित नाही, परंतु मी माझ्या चुकांमधून धडा शिकलो. मला वाटले की मी सुपरस्टार होतो. मला वाटले होते की माझ्याशिवाय शो चालूच राहणार नाही.”
करणला त्याच्या शोच्या सेटवर उशिरा येण्याच्या आणि दारू पिण्याच्या आरोपांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ” हे अगदी खरं आहे. या सर्व चुका मी केल्या पण त्यातून धडाही शिकलो. सगळेच अडखळतात. प्रत्येकजण त्या मार्गावर जातो, पण योग्य मार्गावर येऊन धडा शिकणे महत्वाचे आहे.”