प्रसिद्ध अभिनेता करण वाहीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय. नुकताच करण वाहीला मुंबईत एका अनोळखी व्यक्तीकडून त्रास सहन करावा लागला. ज्याबद्दल त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरून माहिती दिली आहे. त्याच्या या इन्स्टाग्राम स्टोरीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोमवारी रात्री त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली ज्यात त्याने लिहिलं, “मी जोपर्यंत पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलो नाही तोपर्यंत तो माणूस माझा पाठलाग करत होता. ” त्याने केवळ करणचा पाठलागच नाही केला तर तो खूप उद्धटपणे बोलला. करणचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की स्कूटरवर बसलेली एक व्यक्ती करणचा पाठलाग करत आहे आणि त्याच्याशी शाब्दिक वादही घालत आहे. करण म्हणाला, “हा माणूस मी चूक केलीय असं म्हणतोय पण खरंतर यानेच माझ्या गाडीचा पाठलाग करत गाडीला धडक दिली. मुंबई पोलीस कृपया मला मदत करा. हा त्याची चूक मान्य करून हे प्रकरण थांबवत नाहीये.”

करणने नंतर कॅमेरा त्या माणसाकडे वळवला आणि म्हणाला, “हा माणूस माझ्या मागे लागलाय. तू जेवढी मला शिवीगाळ केलीयस ना, तू थांब तुझ्याकडे आता पोलीसच येतील.” या प्रकरणानंतर करणने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आणि लिहलं, “माझ्याबरोबर जी घटना घडली त्याबाबत मी थोडक्यात सांगतो, माझ्यापुढे एक गाडी असल्याने मी लगेच उजव्या बाजूने ओव्हरटेक करत पुढे गेलो. या माणसाने मला शिवीगाळ केली आणि म्हणाला तू गाडी बाजूने काढलीच कशी? मग तो पुढे म्हणाला की तुझ्यासारखे अभिनेते खूप पाहिले आहेत मी.”

हेही वाचा… “मला शाहरुख सरांचा फोन आला अन् त्यांनी…”, भूमी पेडणेकरने सांगितला किस्सा; म्हणाली…

करणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पुढे लिहिलं, “मग मी त्याच्या स्कूटरची चावी घेतली आणि परत दिली व तिथून निघालो. मी पोलीस स्टेशनला पोहोचेपर्यंत त्याने माझा पाठलाग केला. तो शिवीगाळ करत मला म्हणाला की, त्याची पोलिसांत ओळख आहे आणि तो मला याबद्दल चांगलीच अद्दल घडवेल.”

ही घटना घडून गेल्यानंतर थोड्या वेळाने करणने ती स्टोरी इन्स्टाग्रामवरून काढून टाकली. परंतु तोपर्यंत या स्टोरीचे स्क्रिनशॉर्ट सगळीकडे व्हायरल झाले होते. परत एक वेगळी स्टोरी शेअर करत करणने सर्वांना सांगितलं की, तो सुरक्षित आहे आणि त्याने मुंबई पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याने लिहिले, “मी सुरक्षित आहे, मी घरी पोहोचलो आहे. पोलिसांशी माझं बोलणं झालंय. यावर तोडगा निघेल अशी आशा आहे. धन्यवाद मुंबई पोलीस.”

दरम्यान करण वाहीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो आगामी काळात, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि रीम शेख यांच्यासह ‘रायसिंघानी वर्सेस रायसिंघानी’ या शोमध्ये दिसणार आहे.