‘पवित्र रिश्ता’ फेम टीव्ही अभिनेता करणवीर मेहरा आणि निधी सेठ यांचा घटस्फोट झाला आहे. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच ते विभक्त झाले आहेत. २४ जानेवारी २०२१ रोजी एका गुरुद्वारामध्ये त्यांचे लग्न झाले होते, परंतु लग्नाच्या काही महिन्यांनंतर या जोडप्यात मतभेद निर्माण होऊ लागले आणि शेवटी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
वनाधिकाऱ्यांनी ‘बिग बॉस’च्या घरातून स्पर्धकाला केली अटक, ‘ते’ पेंडंट ठरलं कारणीभूत
निधी सेठने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला आहे. तीन महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाल्याचं निधीने सांगितलंय. ती आणि करण गेल्या एक वर्षापासून वेगळे राहत होते. करणचं हे दुसरं लग्न होतं, त्यापूर्वी त्याचा घटस्फोट झाला होता. निधीने तिच्या घटस्फोटाबद्दल माहिती देताना लग्नानंतर दोघांची सतत भांडणं होत होती, असंही नमूद केलं.
निधी ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “आम्ही तीन महिन्यांपूर्वीच वेगळे झालो. मला वाटतं की कोणत्याही नात्यात रोजची भांडणं असह्य असतात आणि अशा वातावरणात कोणीही एकत्र राहू शकत नाही. वैवाहिक जीवनात मानसिक शांती आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय एकमेकांबद्दल आदर आणि प्रामाणिकपणाही महत्त्वाचा आहे. कोणत्याही नात्यात पाऊल ठेवण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. पण खेदाची गोष्ट म्हणजे आजही लोकांना इतरांशी कसे वागावे हेच कळत नाही. त्यामुळे नाती बिघडतात.”
करण वीर मेहरा आणि निधी सेठ यांची पहिली भेट २००८ मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. यानंतर त्यांची दुसरी भेट जीममध्ये झाली आणि ते एकमेकांशी बोलू लागले. निधीला कळालं की करणवीर निर्माता आहे, तेव्हा तिने त्याच्या शोमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. एकत्र काम करत असताना निधी आणि करणवीर प्रेमात पडले आणि नंतर दोघांनी लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, करण वीर मेहराचे हे दुसरे लग्न होते. त्याने २००९ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण देविकाशी लग्न केले होते, पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता. नंतर त्याने निधीशी लग्न केलं, पण तेही नातं टिकलं नाही आणि दोघे विभक्त झाले.